Goa budget Session 2023 : अधिवेशनात अपयशी भाजप सरकारचा खरा चेहरा समोर येईल : युरी आलेमाव

वायफळ खर्च कमी करण्याऐवजी सरकार अधिवेशनाचा कार्यकाळ कमी करत आहे
Yuri Alemao
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

सोमवारी सुरू होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात भाजप सरकारची आत्मस्तुतीच्या कार्यक्रमांवर आणि जाहिरातींवर खर्च झालेल्या करोडो रुपयांची आकडेवारी समोर येणार आहे. या अधिवेशनात अपयशी भाजप सरकारचा खरा चेहरा समोर येईल.

गोंधळलेले भाजप सरकार फालतू खर्च कमी करण्याऐवजी अधिवेशन कार्यकाळात कपात करत आहे, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी हाणला आहे.

Yuri Alemao
Baga Beach Fire: बागा बीचवरील नाईट क्लबमध्ये आग; पार्टी करणाऱ्यांमध्ये उडाला गोंधळ

सर्व विरोधी आमदार गोवा आणि गोमंतकीयांचे प्रश्न व समस्यांवर भाजप सरकारला जाब विचारण्यासाठी सज्ज झाले आहेत. अंमली पदार्थांचा व्यापार, वेश्याव्यवसाय, डान्सबार, खंडणीखोर, पर्यटन क्षेत्रातील दलाल आणि इतर मुद्द्यांवर सरकारला उघडे पाडून भाजप सरकारचेच काही मंत्री आणि काही सत्ताधारी आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे असे युरी आलेमाव म्हणाले.

आमच्या विधानसभेच्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात भाजप सरकारचे अपयश, आपत्ती व्यवस्थापन, म्हादईच्या मुद्द्यावर जाणीवपूर्वक केलेले डोळेझाक, जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढीवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयश, दिवाळखोरीमुळे सरकारी खात्यांतील रिक्त पदे भरण्यात आलेले अपयश, कार्यक्रम आणि प्रसिद्धीवर केलेली अनेक कोटींची उढळपट्टी याचा तपशील यावेळी आम्ही उघड करणार आहोत असा युरी आलेमाव यांनी दावा केला.

Yuri Alemao
Sanguem Accident : सांगे कोठार्ली येथे भीषण अपघात; अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

शॅक ऑपरेटर्सच्या समस्यांवरील "लक्षवेधी सुचनेवर" वर मी आधीच स्वाक्षरी केली आहे आणि मला आशा आहे की पक्षाशी संलग्नता बाजूला ठेवून इतर सर्व आमदार गोव्याच्या पारंपारिक व्यवसायाचे रक्षण करण्यासाठी त्यास पाठिंबा देतील.

मला भेटलेल्या अनुसूचित जमाती समुदायाच्या शिष्टमंडळाला त्यांचा शैक्षणिक तसेच राजकीय आरक्षणाचा मुद्दा मांडण्याचे मी आश्वासन दिले आहे, अशी माहिती युरी आलेमाव यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com