Yuri Alemao : राज्यातील खराब रस्त्यांमुळे रस्ता करात सूट द्या

गोवा सरकारला आजपर्यंत कोळसा वाहतुकीवरील उपकर संकलनातून मिळालेल्या महसुलाचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
Yuri Alemao
Yuri Alemao Dainik Gomantak
Published on
Updated on

Yuri Alemao : चौपदरी महामार्गाला जोडणारा रस्ता कार्यान्वित झाल्याच्या कारणास्तव मुरगाव बंदर प्राधिकरणाने कोळशाच्या हाताळणी आणि साठवणुकीसाठी दर कमी करून अदानी मुरगाव बंदर टर्मिनलला ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात दिलासा दिला आहे. तसाच आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता गोव्यातील रस्त्यांच्या खराब स्थितीसाठी गोमंतकीयांना रस्ता करात सूट द्यावी, अशी सूचक आणि उपरोधिक मागणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार युरी आलेमाव यांनी केली आहे.

मुरगाव बंदर प्राधिकरणाने, अदानी मुरगाव बंदर टर्मिनलला दिलेला दिलासा, तीन रेखीय प्रकल्प केवळ भाजपच्या भांडवलदारांच्या सोयीसाठीच आहेत. या काँग्रेस पक्षाच्या भूमिकेला पुष्टी देतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि परिवहन मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी गोवा सरकारला आजपर्यंत कोळसा वाहतुकीवरील उपकर संकलनातून मिळालेल्या महसुलाचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.

मुरगाव बंदर प्राधिकरण जर महामार्गाचे काम अर्धवट असल्याचे कारण देत अदानी पोर्टला कोळसा हाताळणी शुक्लावर दिलासा देऊ शकते, तर राज्यभरातील रस्त्यांच्या दयनीय परिस्थितीमुळे गोव्यातील जनतेला रस्ता करता सूट देण्यासाठी भाजप सरकारला कोण अडवेल? असा सवाल युरी आलेमाव यांनी केला आहे.

Yuri Alemao
Subhash Shirodkar : ‘ते’ वक्तव्य चांगल्या हेतूनेच; मंत्री सुभाष शिरोडकरांचं घुमजाव

गोमंतकीयांनो जागे व्हा!

गोव्यात रेल्वे डबल ट्रॅकिंग, महामार्गाचे रुंदीकरण आणि वीज वाहिन्या टाकण्याचे काम यासारख्या सर्व पायाभूत सुविधा केवळ भाजपच्या भांडवलदार मित्रांच्या मदतीसाठीच आहेत, हे स्पष्ट आहे. मोदी सरकारने आणलेला मेजर पोर्ट कायदा हा गोव्याला उद्ध्वस्त करण्यासाठी भाजप सरकारने उतललेल एक क्रूर पाऊल होय. गोमंतकीयांना रस्त्यावर फेकून गोव्यातील प्रत्येक गाव आणि शहर भाजपच्या भांडवलदार मित्रांच्या घशात जाण्यापूर्वी गोमंतकीयांनी जागे झाले पाहिजे, असे युरी आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com