Goa News: समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या माथेफिरू परप्रांतियास शिवप्रेमींनी शिकवला धडा

नाक रगडून माफी मागायला भाग पाडले.
Sankhalim News
Sankhalim News Dainik Gomantak

Sanquelim: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हिरवा झेंडा फडकावून, समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या माथेफिरू परप्रांतियास शिवप्रेमींनी चांगलाच धडा शिकवला आहे. शिवप्रेमींनी या तरूणाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागायला भाग पाडले. व त्यानंतर त्याला सोडण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा मतदारसंघ असलेल्या साखळीत ही घटना घडली आहे.

Sankhalim News
Goa Politics: मुंबईत फडणवीस भेट; खरी कुजबूज

या प्रकरणाचा अधिक तपशील असा आहे. गेल्या रविवारी ऊरस असल्यानिमित्ताने साखळीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी एका परप्रांतिय तरूणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हिरवा झेंडा हातात घेऊन फडकावला. या घटनेचा व्हिडिओ काही जणांनी चित्रित केला व तो मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर शिवप्रेमींनी या परप्रांतिय तरूणाला शोधून काढले.

Sankhalim News
Goa Kala Academy: ‘क्लिप दाखवा स्पष्टीकरण देऊ’; मंत्री गोविंद गावडे यांचे स्पष्टीकरण

शिवप्रेमींनी तरूणाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आणले व माफी मागायला लावली. तरूणाला नाक रगडून महाराजांची माफी मागायला लावल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली. हा परप्रांतिय माथेफिरू तरूण कामानिमित्त गोव्यात असतो व भाड्याच्या खोलीत राहतो अशी माहिती मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com