पणजी: कला अकादमीच्या कामाविषयी मंत्री नीलेश काब्राल यांनी जे काही म्हटले आहे, त्याची क्लिप आपणास दाखवावी आपण त्यावर स्पष्टीकरण देऊ, असे मंत्री गोविंद गावडे यांनी अकादमीच्या कामावरून सुरू झालेल्या वादावर मत व्यक्त करताना सांगितले.
(Minister Govind Gawde's explanation about the work of Kala academy)
कला व संस्कृती खात्याशी चर्चा करूनच कला अकादमीच्या कामाची निविदा दिल्याचे नीलेश काब्राल यांनी म्हटले आहे, यावर त्यांनी वरील भूमिका मांडली. गोवा प्रभारी सी. टी. रवी यांच्या बैठकीस उपस्थित राहिलेल्या मंत्री गोविंद गावडे यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांकडे आपले मत व्यक्त केले. 2023 मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी गोवा सज्ज आहे. आपण क्रीडामंत्री म्हणून जे काम केले आहे, त्यामुळेच आपण ही स्पर्धा घेऊ शकतो असा आत्मविश्वास आहे. तारीख आणि महिना हा मुख्यमंत्री प्रमोद सावंत चर्चा केल्यानंतर ठरविण्यात येईल.
कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम कोणाला द्यायचे, याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. आपल्याविषयी कोणाला आसुया असेल, त्यामुळेच आपल्यावर आरोप केले जात आहेत. ज्या झाडाला फळे लागतात, त्यालाच दगड मारतात, असे त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.