काणकोण : सजीव सृष्टीत सागरी जीव सृष्टीला तेवढेच महत्त्वाचे स्थान आहे. त्यासाठी सागरी सृष्टीचे जतन व संवर्धन होणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गरजेचे आहे. गालजीबाग समुद्र किनारा हा सागरी कासवांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. येथे 1 लाख 72 हजार चौरस मीटर जमीन वनखात्याने संपादित केली आहे. या ठिकाणी सागरी कासव संशोधन केंद्र व्हावे, असे प्रतिपादन सभापती रमेश तवडकर यांनी जागतिक सागर कासव संवर्धन दिवस कार्यक्रमात बोलताना केले.
या केंद्रामुळे गालजीबाग किनाऱ्यावर ‘इको टुरिझम’ला वाव मिळून येथील रहिवाशांना रोजगाराची संधी मिळेल. उत्तर गोव्यातील किनारे गजबजले आहेत, त्यामानाने काणकोण मधील सागरी कासवांसाठी आरक्षित असलेले आगोंद,गालजीबाग हे किनारे शांत आहेत. त्यांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी येथील रहिवाशांचे योगदान फार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
उपवनपाल अनिकेत नाईक गावकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला सहाय्यक वनपाल दामोदर सालेलकर,सरपंच सविता तवडकर,उपसरपंच सुनील पैंगणकर,पंच जॉन बार्रेटो,शिल्पा प्रभूगावकर,महेश नाईक, एनजीओ डॉ. पूजा मेत्रा, डॉ.मनिषा राव उपस्थित होत्या.
यावेळी टेरा कन्शियस या ‘एनजीओ’च्या प्रमुख पूजा मेत्रा यांनी समुद्री जीवांच्या रक्षणासाठी राज्यात दृष्टीचे जीव रक्षक, किनारा स्वच्छता कामगार व वनखात्याचे रक्षक तसेच एनजीओ यांचे एक संघटन राज्यात कार्यरत आहे.
असे संघटन करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच सविता तवडकर यांनी जीवन साखळीत प्रत्येक जीव महत्वाचा असून त्यांचा सांभाळ करणे बुद्धिमान प्राणी म्हणून मानवाचे प्रथम कर्तव्य असल्याचे सांगितले.
यावेळी सूत्रसंचालन सीमी हडकोणकर व नितेश नाईक यांनी केले. वनखात्याच्या सागरी रेंजचे क्षेत्रिय वनाधिकारी राजेश नाईक यांनी आभार मानले. या औपचारिक कार्यक्रमानंतर डॉ. पूजा मेत्रा, डॉ.मनिषा राव यांनी सागरी जीव सृष्टी व त्यांच्या संवर्धनासाठी मार्गदर्शन केले.
जीवरक्षक, स्वच्छता कामगारांचा गौरव
वनखात्याचे सागरी रक्षक,दृष्टीचे जीवरक्षक व किनारी स्वच्छता कामगार यांचा पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये उल्हास पागी,समीर भंडारी, तुकाराम मेत्री,शाम भंडारी,अजय पागी,येसू पागी,संदीप पागी,नेस्टर फर्नांडिस, जॉन मोंतेरो, सर्वेश पागी, दिप्ती पागी, जाफ्रिनो कार्व्हालो, दादापीर मुल्ला,सर्वेश चोपडेकर,अक्षय पागी, संजीव मेत्री,राम भंडारी,कृपाश पागी, देवेंद्र पागी, सिद्धेश काणकोणकर, संदेश वेळीप, विदीत मोखर्डकर यांचा समावेश होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.