Canacona Theater Festival : कला अस्वस्थ करणारी असावी - श्रीजिता करचौधरी

कलाकार जे सादर करतो त्यात त्याच्या प्रामाणिकपणामुळे बराच फरक पडू शकतो हे आपल्याला सांगत आहेत श्रीजिता करचौधरी
श्रीजिता करचौधरी
श्रीजिता करचौधरीGomantak Digital Team
Published on
Updated on

एखादी कला अनुभवण्यासाठी प्रेक्षक म्हणून आपलीही एक विशिष्ट भूमिका असायला हवी. कलाकार जे सादर करतो त्यात त्याच्या प्रामाणिकपणामुळे बराच फरक पडू शकतो हे आपल्याला सांगत आहेत श्रीजिता करचौधरी. पैंगीण येथील 'काणकोण नाट्य महोत्सवा'त त्यांची उपस्थिती होती. दैनिक गोमन्तककडे बोलताना कलेसंबंधी त्यांनी आपले विचार स्पष्ट केले.

बादल सरकार यांची मी वारस आहे हे स्वीकारणे आणि तशी ओळख सांगणे ही सोपी गोष्ट नाही, कदाचित त्यमुळेच मी सार्वजनिकपणे त्याचा कधीच वापर करत नाही. ती अत्यंत खाजगी गोष्ट आहे असे मानून मी चालत असते. मला 'वारस' या शब्दाची व्याख्या आणि शब्दकोशामधला त्याचा अर्थ ठाऊक आहे पण माझ्या चालचलनात मी बादल सरकार यांची कितपत वारस आहे याची मला कल्पना नाही.

श्रीजिता करचौधरी
Canacona Theater Festival: बादल सरकारांचे थर्ड थिएटर आणि त्याचे वर्तमानकालीन प्रतिबिंब

पण मी एक गोष्ट नक्कीच सांगू शकते ती म्हणजे, त्यांच्याप्रमाणेच मला निर्मिती करणे आवडते आणि रंगभूमीवर किंवा रंगभूमीसाठी काहीतरी निर्मिती करणे हे माझे स्वप्न आहेच. पण बादल सरकार यांनी त्यांचे महत्त्वाचे काम पूर्ण केल्यानंतर बऱ्याच वर्षांनी एक समकालीन काळातली व्यक्ती म्हणून बंगालपासून शेकडो किलोमीटर दूर अंतरावर मी वाढले.

मध्यमवर्गीय असल्याने माझ्या हातात फार कमी संसाधने उपलब्ध होती आणि कुटुंबातले एकमेव मूल असल्याने मला माझा स्वतःचा मार्ग शोधावा लागला आणि माझ्या स्वतःच्या कहाण्या घडवाव्या लागल्या. साधने, पुस्तके, संगीत, नृत्य, घाट इत्यादी जे मला बंगालमध्ये उपलब्ध होऊ शकले असते ते मला दिल्लीमध्ये उपलब्ध नव्हते.

श्रीजिता करचौधरी
Theater: काणकोण नाट्य महोत्‍सव आजपासून

मग इतर लोकं होती ज्यांना मी ऐकत आले होते, अनेक फॉर्म होते जे मी पहात होते आणि अर्थात माझे कुटुंब अशाप्रकारच्या पार्श्वभूमीतून येत असल्यामुळे त्यांची मूल्ये, त्यांचे ज्ञान माझ्यावर आपसूकच लादले जात होते. या सर्व गोष्टींमुळे मी बहुविद्याशाखीय (मल्टी डिसिप्‍लिनरी) व्यक्ती बनले.

केवळ पाहण्यासाठी म्हणून नाटके पाहणे मला आवडत नाही तर त्यातला 'परफॉर्मन्स' हा मला महत्त्वाचा वाटतो. 'परफॉर्मन्स' कुठलाही कलेत असू शकतो. तुम्ही ती कला कशाप्रकारे सादर करता यावर ते अवलंबून असते. मला अशाप्रकारचे नाटक आवडते, जे लोकांना विचार करायला लावते, त्यांना जे बदलवू शकते, ज्यातून लोक काही महत्त्वाचे घरी नेऊ शकतात.

श्रीजिता करचौधरी
Theater: मराठी हौशी रंगभूमी आणि गोमंतकीय रंगकर्मी

कला ही केवळ तुम्हाला सुखावण्यासाठी नसते तर ती तुम्हाला अस्वस्थ करणारीदेखील असू शकते. नाही का? असे अस्वस्थ होणे काहीवेळा बरे असते. सुखासीनता ही प्रकारची नशा आहे. मला व्यक्तिशः असे वाटते की नाटकातून केवळ भारून टाकणारी दृश्यात्सकता नव्हे तर मानवी वास्तव, जगाबद्दलचे सत्य स्वरूप या गोष्टी यायला हव्यात.

प्रोसेनियम असो, रस्तानाट्य असो व असे एखादे नाटक असो ज्याच्या नेपथ्यात असंख्य चिजा मांडलेल्या दिसताहेत- मी त्यांची वर्गवारी करायला जाणार नाही. पण शुद्ध प्रामाणिकपणे केलेले काहीही, जे सादरकर्त्यांनी आगदी ह्रदयपूर्वक सादर केलेले असेल ते मला पहायला आवडेल. ज्या नाटकाने तुमच्यात थोडातरी बदल घडवून आणलेला असेल किंवा तुम्हाला पुढे जाण्यास प्रवृत्त केले असेल तर तीच कला अस्सल असेल. अशा प्रकारचे नाटक पाहणे मला आवडेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com