Canacona Theater Festival: बादल सरकारांचे थर्ड थिएटर आणि त्याचे वर्तमानकालीन प्रतिबिंब

पैंगिण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 'काणकोण नाट्यमहोत्सवा'त श्रेष्ठ भारतीय नाटककार बादल सरकार यांच्या नात श्रीजिता करचौधरी उपस्थित होत्या. त्या स्वतः आधुनिक समकालीन रंगमंभूमीशी संबंधित आहेत.
Dancer
DancerGomantak Digital Team
Published on
Updated on

Canacona Theater Festival: पैंगिण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या 'काणकोण नाट्यमहोत्सवा'त श्रेष्ठ भारतीय नाटककार बादल सरकार यांच्या नात श्रीजिता करचौधरी उपस्थित होत्या. त्या स्वतः आधुनिक समकालीन रंगमंभूमीशी संबंधित आहेत.

पन्नास वर्षांपूर्वी बादल सरकारांनी आकाराला आणलेल्या 'थर्ड थिएटर'चा आणि चळवळ म्हणून आज भारतात सादर होणाऱ्या नाट्यसादरीकरणांचा परस्पर संबंध त्यांनी आपल्या शब्दांमधून उलगडला....

घराण्याचा वारसा या शब्दांवर माझा फारसा विश्वास नाही. मला असे वाटते की सारेच ‘वारसा’ एकसारखे साजरे होऊ शकत नाहीत. मी जर एखाद्या प्रतिष्ठित राजकारण्याची किंवा एखाद्या फिल्मस्टारची मुलगी किंवा नात असते तर गोष्ट वेगळी असती.

पण अशा एका महान नाटकाराची नात असणे, ज्याने एका अशाप्रकारच्य नाट्यशैलीचा पुरस्कार केला ज्यामधून त्याला फारशा पैशांची कमाई झाली नाही त्यात वासरा ‘साजरा’ करण्यासारखे काय आहे?

Dancer
Blog: कामसू हात, स्वाभिमानी मान आणि प्रेमळ मन

बादल सरकारचे ‘थर्ड थिएटर’ ही एक अशी गोष्ट आहे जी आशा निर्माण करते. आपला व्यवसाय सांभाळून त्यांनी केलेली ती गोष्ट होती.

बादल सरकार काम करायचे आणि त्याचवेळी ते नाटके लिहायचे, दिग्दर्शित करायचे आणि त्यांची निर्मिती करायचे. त्यांच्याकडे ती क्षमता होती आणि सत्य मांडायची हिंमतही होती

‘थर्ड थिएटर’ बाबत बोलायचे झाले तर त्याच्यातून आज नवीन नवीन रुजून येताना नक्कीच जाणवते आहे. आजच्या काळातल्या सादरीकरणाबद्दल सांगायचे झाले तर- ‘सादरीकरण’ हा शब्द मी जाणून बुजून वापरते आहे कारण नाटक हे आज केवळ नाटक राहिलेले नाही.

मी आज जे पाहते त्यात मला ‘नाट्यात्मक सादरीकरण’ दिसते किंवा ते ‘सादरीकरणात्मक नाट्य’ असते.

Dancer
Blog: स्तुती, निंदा आणि त्यांचे प्रयोजन

आजचे अनेक तरुण रंगकर्मी ‘थर्ड थिएटर’च्या संकल्पनेचा पाया वापरून नवीन काहीतरी रचण्याचा प्रयत्न करत आहेत.

ते वापरत असलेले ‘ब्लॅक बॉक्स रंगमंच’ किंवा शाळा-कॉलेजमधून आज लोकप्रिय असलेले ‘रस्ता नाट्य’ हा त्याचाच एक भाग आहे. अशाप्रकारे प्रयोग करण्यासाठी फारसे पैसे लागत नाहीत आणि आपल्याला जे सांगायचे आहे किंवा जी माहिती द्यायची आहे ती देता येते.

पण मुळात मला हे ठाऊक आहे की ‘थर्ड थिएटर’ मागील संकल्पना ही कमी खर्चात नाटक व्हावे यापुरती मर्यादित नव्हती किंवा लोकांना जे ठाऊक आहे तेच पुन्हा सांगण्यापुरती नव्हती तर त्या पलीकडे जाऊन, काळाला सुसंगत असलेला बदल घडवून आणणे ही होती.

कलेच्या बाबतीत धोका हा असतो की अनेकदा कलाकार, गोष्टीचा उद्देशच जाणून न घेता विशिष्ट चक्रात अडकून ती गोष्ट मांडत राहतो.

Dancer
Blog : गोव्याच्या शिक्षणक्षेत्रात शिक्षण किती, आणि प्रशासन किती ?

सादरीकरणाचा उद्देश हा गोष्टीचा अर्थ सांगण्यापुरता किंवा खेळकरपणे, निष्ठेने, प्रामाणिकपणे ती गोष्ट सादर करावी इतक्यापुरता मर्यादित नसतो. त्यात तुम्ही सर्वसामर्थ्यांनीशी बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने काय गुंफलेले आहे हे लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.

थर्ड थिएटर हा नुसता एक घाट किंवा शैली नाही तर ठाऊक असलेल्या गोष्टींमध्ये घडवून आणलेला तो एक बदल आहे. आमचे आधीचे नाटक शेक्सपियरप्रणित होते, जे उच्च वर्गाच्या व त्यांच्या आपसातल्या संघर्षाच्या कहाण्या सांगत होते. त्या पार्श्वभूमीवर बादल सरकार मध्यमवर्गीय माणसाबद्दल लिहितात. शहरी मध्यमवर्गीय माणसाला कुठल्या परिस्थितीतून जावे लागत आहे, भारताची ग्रामीणता वगैरे.

Dancer
Blog : स्त्रीला किमान माणूस तरी समजा

बादल सरकार आशयातल्या बदलासंबंधाने काम करत होते. त्यांच्या सादरीकरणातून त्यांनी सामान्य माणसाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला की, ‘आता ती वेळ आली आहे!’. म्हणून मला वाटते, थर्ड थिएटर हे केवळ नाटकाची रचना किंवा रचनेची तोडमोड याबद्दल नाही तर ते कथेची पुनर्रचना किंवा कथेच्या मोडतोडीसंबंधात आहे.

तरुण नाट्यकर्मी ज्या प्रकारे आज समरसून नाटक करत आहेत त्यातूनही त्यांचा कथेची नवी मांडणी करण्याचा प्रयत्न मला जाणवतो. इंटिमेट थिएटर, ब्लॅक बॉक्स यामधून नाटक नव्हे तर सादरीकरणे होत असतात, ज्यातून थर्ड थिएटर झळकताना दिसते. मला वाटते त्यांनाही त्यांचा मार्ग नक्कीच सापडेल.

त्यांनाही बदल घडवून आणायचा आहे. सतत काम करत राहण्याने आणि त्या दिशेने वाटचाल करण्यानेच एक प्रकारचा साक्षात्कार आम्हाला सर्वांना घडेल. नव्या शैली, नव्या कहाण्या, नव्या रचना याबद्दल आम्ही बोलायला सुरुवात करू आणि त्यावेळी थर्ड थिएटर ही फार मागे राहिलेली बाब असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com