World Tourism Day 2023: गोव्यात रशियन पर्यटकांची संख्‍या रोडावली; युद्धाचा परिणाम

आवश्‍‍यक सुविधांसह रस्ते नीटनेटके करण्‍याची मागणी
Tourist
Tourist Dainik Gomantak

Goa And Russian Tourists Connection: खाण व्यवसाय बंद झाल्यानंतर सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणारा व्‍यवसाय म्‍हणजे पर्यटन. म्‍हणूनच वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून पर्यटनवृद्धीसाठी सरकार प्रयत्‍नशील आहे.

असे असले तरी कोरोना महामारीनंतर मांद्रे मतदारसंघातील किनारी भागांचा आढावा घेतला असता असे दिसून आले की, विदेशी पर्यटकांच्‍या संख्‍येत कमालीची घट झाली आहे.

कोरोनापूर्वी २५ ते २६ हजार केवळ रशियन पर्यटक यायचे, ही संख्‍या आात चार ते साडेचार हजारांपर्यंत खाली आली आहे. उलट देशी पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत असून ते मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसायाला हातभार लावत आहेत.

Tourist
Goa Tourism: नवीन शॅक्‍स धोरण पर्यटनाला मारक; व्यावसायिकांचा दावा

रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस कमकुवत बनत चालली आहे. त्‍याचा परिणाम गोव्‍याच्‍या पर्यटनावर झाला आहे. रशियन पर्यटक मोठ्या प्रमाणावर खर्च करतात.

त्याचा फायदा किनारी भागातील व्‍यावसायिकांना होत होता. पण आता ती स्‍थिती राहिलेली नाही. किनारी भागातील हॉटेल्‍स, रेस्टॉरंट्‌स, गेस्ट हाऊसवर नजर मारली तर देशी पर्यटकांची संख्या जास्‍त दिसून येते.

विदेशी पर्यटकांची संख्या घटण्यामागे अनेक कारणे आहेत. आवश्यक साधनसुविधांचा अभाव, खराब रस्ते व त्‍यामुळे वाढलेले जीवघेणे अपघात, पार्किंगची गैरसोय, विजेचा लपंडाव, चोऱ्यामाऱ्या, दादागिरी आदी. चार्टर विमानाने येणाऱ्या पर्यटकांना सध्या महागाईचा सामना करावा लागतोय. त्‍यामुळे या पर्यटकांनी किनारी भागाकडे पाठ फिरवली आहे.

‘मिनी रशिया’ मोरजीतही सन्नाटा

मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात पूर्वी मोठ्या प्रमाणात रशियन पर्यटकांची गर्दी असायची. मोरजीला तर ‘मिनी रशिया’ म्हणून ओळखले जायचे. आजही रशियन भाषेतील फलक तेथे नजरेस पडतात.

मात्र रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले आणि स्‍थिती पलटली. शिवाय ‘बुईंगा’ हे अमेरिकेचे विमान युरोपमधून भारतात यायचे, तेसुद्धा थेट रशियातून.

ते विमान बंद झाल्यामुळे रशियन पर्यटकांना गोव्यात येण्‍यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे रशियातील लोकांनी आपला मोर्चा सध्या दुबई आणि इजिप्तकडे वळविला आहे.

"किनारी भागात रशियन पर्यटकांच्‍या सूजय कोलवाळकरसंख्येत लक्षणीय घट झालेली आहे. मात्र देशी पर्यटकांची संख्‍या वाढत चालली आहे. ही एक जमेची बाजू आहे. आता तरी सरकारने पर्यटकांसाठी आवश्‍‍यक त्‍या मूलभूत सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या पाहिजेत. अन्‍यथा उर्वरित पर्यटकही पाठ फिरवतील."

- सूजय कोलवाळकर, रिसॉर्ट व्‍यावसायिक

Tourist
Goa Sports: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भ्रष्टाचार!आपचा आरोप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com