Goa Sports: राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसंबंधात निविदा प्रक्रियेत भाजप सरकारकडून हेराफेरी करण्यात आले असून एका विशेष आस्थापनालाच ही निविदा मिळावी, या हेतूने षडयंत्र रचले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या नावाने भाजप सरकार भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केला आहे.
यावेळी आपचे नेते ॲड. सुरेल तिळवे, वाल्मिकी नाईक, सलमान खान, सरफराज शेख आणि फ्रान्सिस कोएल्हो उपस्थित होते.
ॲड. पालेकर म्हणाले, भाजप सरकारमधील भ्रष्टाचाराची लालसा इतकी तीव्र आहे की, त्यांनी कमी अनुभवी कंपनीला अधिक अनुभवी ठरवले आहे. शिवाय या विशेष कंपनीने २० टक्के अधिक बोली लावले आहे, असे असताना या विशेष कंपनीला सरकारने निवडले आहे. परिणामी याचे पडसाद नंतर उमटतील जेव्हा आयोजनात अभाव जाणवेल आणि सरकारच्या या भ्रष्ट कारभारामुळे राज्याचीही बदनामी होईल, असे खंत पालेकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या 120 कोटी रुपयांच्या निविदेसाठी थॉमस कूक आस्थापनची सर्वात कमी बोली लावणारा म्हणून निवड केल्याबद्दल पालेकर यांनी भाजप सरकारवर टीका केली. याउलट दुसऱ्या अनुभवी बोलीदाराने हेच काम केवळ 92 कोटी रुपयांमध्ये करण्याची ऑफर दिली होती. या निर्णयामुळे सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे पालेकर म्हणाले.
त्वरित चौकशी करा
करदात्यांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाच्या खर्चावर असा निर्णय घेण्यात आला हे अत्यंत दुःखदायक आहे. गोव्यातील क्रीडा सुविधा वाढविण्यासाठी आणि क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी या निधीची तरतूद करता आली असती. या घोटाळ्याची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी पालेकर यांनी केली. योग्य कारवाई न केल्यास आप कायदेशीर कारवाई करेल, असा इशारा त्यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.