World Pharmacists Day
World Pharmacists DayDainik Gomantak

World Pharmacists Day: ‘जागतिक फार्मसिस्ट’ दिवस उत्साहात साजरा

World Pharmacists Day: 25 सप्टेंबर रोजी जागतिक फार्मसिस्ट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
Published on

World Pharmacists Day: भारतीय फार्मास्युटिकल असोसिएशनच्या गोवा शाखेतर्फे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ऑफ गोवा, गोवा फार्मसी महाविद्यालय, अन्न आणि औषध प्रशासन संचालनालय व गोवा राज्य फार्मसी कौन्सिल यांच्या सहयोगाने 25 सप्टेंबर रोजी जागतिक फार्मसिस्ट दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

World Pharmacists Day
Pernem Municipality: पेडणे नगराध्यक्षांची ग्वाही कामगारांकडून आंदोलन स्थगित

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर व सन्माननीय अतिथी म्हणून अन्न आणि औषध प्रशासन संचालक ज्योती सरदेसाई उपस्थित होते. तसेच गोवा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एस. नाडकर्णी, गोवा फार्मास्युटिकल्स उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार खुल्लर, व्हर्गो फार्मा रिसर्च लॅबोरेटरिजचे कार्यकारी संचालक अमित कामत, गोवा राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष प्रकाश शंखवाळकर हेही यावेळी उपस्थित होते.

World Pharmacists Day
Kalarang Mohostav: मडगावात ‘कलारंग महोत्सव’

गोवा फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल कृष्ण राव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गोवा फार्मसी महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांना डी. फार्म, बी. फार्म आणि एम. फार्ममधील त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल गौरविण्यात आले. भारतीय फार्मास्युटिकल असोसिएशन, गोवा शाखेचे सचिव प्रसाद तांबा यांनी आभार मानले.

यांचा झाला गौरव : यावेळी भारतीय फार्मास्युटिकल्स असोसिएशनच्या गोवा शाखेचे व गोवा राज्य फार्मसी कौन्सिलचे माजी अध्यक्ष यांचा या क्षेत्रातील योगदानाबद्दल शिक्षण सचिवांच्या हस्ते गौरव करण्यात आला. माजी अध्यक्ष स्व. एस. कोलवाळकर,

स्व. डाॅ. कॉस्ता फ्रायस आणि स्व. एस. एन. त्रिपाठी यांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला. तर दिलीप कुंकळयेकर, शरदचंद्र सरदेसाई, संजय प्रियोळकर, राजेंद्र नाईक, सलीम वेलजी, अनंत नाईक तसेच डॉ. एल. एच. भोसले, प्रकाश शंखवाळकर यांनाही गौरविण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com