Kalarang Mohostav: मडगावात ‘कलारंग महोत्सव’

Kalarang Mohostav: 12 ते 16 रोजीपर्यंत आयोजन : कलाविष्काराचे घडणार दर्शन
Kalarang Mohostav
Kalarang MohostavDainik Gomantak
Published on
Updated on

Kalarang Mohostav: कला संस्कृती खाते, रवींद्र भवन मडगाव यांच्या सहकार्याने मडगावच्या ख्यातनाम ‘कलांगण’ या संस्थेने 12 ते 16 ऑक्टोबर असे पाच दिवस ‘कलारंग महोत्सवा’चे आयोजन केले आहे. या महोत्सवात संगीत, नृत्य व नाट्याविष्काराचे दर्शन घडविले जाईल.

Kalarang Mohostav
Goa Farming News: 3.5 कोटींचा बांध 4 महिन्‍यांत 2 वेळा फुटला

आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांकडून गोमंतकीय कलाकारांना प्रोत्साहन, स्फूर्ती मिळावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केल्याचे रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी मंगळवारी (ता.३) मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. मडगाव व परिसरात जवळजवळ १५०० मुले कलेचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी हा महोत्सव एक पर्वणीच असेल, असेही तालक म्हणाले.

कलांगण ही संस्था स्थापनेचे 26 वे वर्ष साजरे करीत आहे, असे सांगून संस्थेचे अध्यक्ष वकील राजीव शिंक्रे यांनी कलारंग महोत्सवातील कार्यक्रमाची रूपरेषा सादर केली.

महोत्सवाचे उद्‌घाटन गुरुवार, 12 रोजी सायंकाळी 6.15 वाजता रवींद्र भवन मडगावच्या मुख्य सभागृहात होणार आहे.

या सोहळ्यास कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यासह मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर मूळ गोमंतकीय पण मुंबईत स्थायिक झालेले युवा व्हायोलिन वादक मिलिंद रायकर हे व्हायोलिन वादनाचा कार्यक्रम होईल.

Kalarang Mohostav
Pernem Municipality: पेडणे नगराध्यक्षांची ग्वाही कामगारांकडून आंदोलन स्थगित

शुक्रवार, 13 रोजी सायंकाळी 6.30 वाजता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धारवाड येथील गायक व्यंकटेश कुमार हे शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. त्यानंतर 7.30 वाजता स्मिता महाजन, अल्का लाजमी या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कलांगणचे विद्यार्थी भरतनाट्यम्‌ नृत्य सादर करणार आहेत.

शनिवार, 14 रोजी सायंकाळी 6.30 वाजता कुडाळ-सिंधदुर्ग येथील प्रसिद्ध युवा गायिका योगीता रायकर हिच्या गायनाचा कार्यक्रम होईल.

त्यानंतर 7.30 वाजता डॉ. ऐश्र्वर्या वारियर व संचातर्फे मोहिनीअट्टम नृत्य कार्यक्रम सादर केले जाईल.

रविवार, 15 रोजी सायंकाळी 7 वाजता मुंबईच्या प्राइमटाईम थिएटर ॲण्ड कंपनीतर्फे निर्मित ‘गौहर’ या इंग्रजी नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

महोत्सवाची सांगता सोमवार, 16 रोजी सायंकाळी 7 वाजता ‘लावण्यवती’ या मराठी नृत्य नाटकाने होणार आहे. या नाटकाची निर्मिती काली बिल्ली प्रॉडक्शनतर्फे करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com