Sanofi Pharma Goa: गोव्यातील महिलाही करणार 'नाईट शिफ्ट'; सनोफी फार्मा कंपनीला राज्य सरकारकडून परवानगी

फार्मास्युटिकल संस्थांसह उद्योग संस्थांनी 2017 मध्ये केली होती मागणी
Women woking in night shift
Women woking in night shift Dainik Gomantak
Published on
Updated on

Night Shift for Goan Women in Sanofi Pharma Verna: फार्मा जायंट मानल्या जात असलेल्या सनोफी या फार्मास्युटिकल कंपनीत वेर्णा येथील कार्यालयात महिलांना नाईट शिफ्टमध्ये (रात्रपाळीत) काम करता येणार आहे.

तशी परवानगी गोवा राज्य सरकारने कंपनीला दिली आहे. एरवी नाईट शिफ्टमध्ये कामासाठी नेहमीच पुरूष कर्मचाऱ्यांचा विचार केला जातो. पण, आता या निर्णयामुळे महिलांनाही रात्रपाळीत काम करता येणार आहे.

सनोफी फार्मामध्ये महिलादेखील सायंकाळी 7 ते सकाळी 6 या वेळेत काम करतील. तथापि, ही परवानगी दोन वर्षांसाठी असणार आहे.

याबाबत जून 2017 मध्ये, फार्मास्युटिकल संस्थांसह उद्योग संस्थांनी राज्य सरकारला पत्र लिहून उत्पादन क्षेत्रात महिलांनादेखील सायंकाळी 7 वाजेच्या पुढे काम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती.

दरम्यान, ऑगस्ट 2019 मध्ये गोवा सरकारने गोवा फॅक्टरीज (सुधारणा) विधेयक मंजूर केले. याद्वारे महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी दिली गेली आहे.

Women woking in night shift
Goa Literacy Rate: गोवा 7 महिन्यात बनणार 100 टक्के साक्षर राज्य! 1500 निरक्षरांचे शिक्षण सुरू...

Sanofi India Ltd ला परवानगी देणार्‍या इन्स्पेक्टोरेट ऑफ फॅक्टरीज अँड बॉयलर्सच्या निरीक्षकांनी कंपनीवर काही गोष्टींसाठी सक्तीदेखील केली आहे. Sanofi ला महिला कामगारांची लेखी संमती घ्यावी लागेल. कामाचे सुरक्षित आणि निरोगी वातावरण प्रदान करावे लागेल.

सनोफीला कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण) कायदा, 2013 किंवा कारखान्याला लागू असलेल्या इतर कोणत्याही कायद्याच्या तरतुदींचे पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

पिक अप - ड्रॉप सुविधा...

महिलांसाठी स्वतंत्र पिकअप आणि ड्रॉप सुविधा उपलब्ध करून देण्यासही निरीक्षकांनी कंपनीला सांगितले आहे. महिलांना कारखाना ते घर या अंतरात एक सुरक्षारक्षक द्यावा लागेल.

Women woking in night shift
Goa Government Jobs: सरकारी नोकरीसाठी आता अनुभव गरजेचा; किमान एक वर्ष अ‍ॅप्रेंटिसशिप करावी लागणार...

याशिवाय सनोफीला हे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे की, कामाच्या ठिकाणी, ज्यामध्ये सोयींच्या दिशेने जाणारे मार्ग किंवा शौचालय, वॉशरूम, पिण्याचे पाणी, प्रवेश आणि बाहेर पडणे यासारख्या सुविधांचा समावेश या सुविधांबाबत दक्षता घेतली जावी.

तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी CCTV पाळत ठेवण्याचाही विचार करावा.

इन्स्पेक्‍टोरेटने असेही नमूद केले आहे की, मातृत्व लाभ कायदा, 1961 किंवा अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यानुसार प्रसूती लाभाच्या तरतुदींच्या विरोधात कोणत्याही महिला कामगाराला कामावर ठेवता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com