Goa News: पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेला हैदराबाद पोलिसांनी गोव्यात शोधून काढले

Goa News: मात्र त्या महिलेने हैदराबादमधील पूर्वीच्या नवऱ्यासोबत जाण्यास नकार दिला असून तिच्या म्हणण्यानुसार नव्या आयुष्यावर ती खूष आहे.
Goa Police News
Goa Police News Dainik Gomantak

Goa News: पाच वर्षांपासून बेपत्ता असलेल्या महिलेला हैदराबाद पोलिसांनी गोव्यात शोधून काढले. मात्र त्या महिलेने हैदराबादमधील पूर्वीच्या नवऱ्यासोबत जाण्यास नकार दिला असून तिच्या म्हणण्यानुसार नव्या आयुष्यावर ती खूष आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही कथा प्रत्यक्षात घडली आहे. सध्या आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एसएमएस येऊ लागले आहेत.

Goa Police News
Truck Accident In Chorla: चोर्लाघाटात ट्रक कलंडल्यामुळे वाहतूक कोंडी

सर्व बँकिंग व इतर सरकारी व्यवहारांसाठी आधार कार्ड आवश्‍यक आहे. एका महिलेने आपले आधार कार्ड गोव्यात अपडेट केले आणि तिचा शोध हैदराबाद पोलिसांना लागला. हैदराबादच्या हुमायूननगरमधील ती महिला २९ जून २०१८ पासून बेपत्ता होती. ३६ वर्षीय या महिलेचे लग्न झालेले होते आणि हुंड्यासाठी तिचा छळ होतो अशी तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांत ती बेपत्ता झाल्यानंतर दिली होती.

Goa Police News
Excise Department : कर्नाटक सीमेवर कडक तपासणी, अबकारी विभाग सक्रिय

याआधी ती दोन वेळा २०१४ आणि २०१५ मध्ये घरातून निघून गेली होती व काही दिवसांनी परतली होती. यामुळे २०१८ मध्येही ती बेपत्ता झाली तेव्हा ती परत येईल असे कुटुंबीयांना वाटले होते. ती परत न आल्याने पोलिसात तक्रार दिली. तिच्या वडिलांनी तर उच्च न्यायालयात हेबियस कोर्पस अर्ज सादर केला. त्यामुळे पोलिसांसमोर तिला न्यायालयात सादर करण्याचे आव्हान उभे ठाकले होते.

तिने समाज माध्यम व डिजिटल पद्धतीची सर्व कागदपत्रे नष्ट केल्याने तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर गोव्यात तिने आपले आधार अपडेट केले. हैदराबाद पोलिसांना ती माहिती मिळाल्यावर ते गोव्यात आले आणि तिचा ताबा मिळवला पण न्यायालयात तिने आपण नव्या आयुष्यात खूष आहे, अशी भूमिका घेतली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com