Crocodile Attack Goa: कपडे धुवायला गेलेल्या महिलेवर मगरींचा जीवघेणा हल्ला; सातोणमध्ये भीतीचे सावट

woman attacked by crocodile: सातोण, दाभाळ येथील दूधसागर नदीवर कपडे धुवायला गेलेल्या एका स्थानिक महिलेवर दोन मगरींनी अचानक हल्ला केला
crocodile fear in village Goa
crocodile fear in village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: सातोण, दाभाळ येथील दूधसागर नदीवर कपडे धुवायला गेलेल्या एका स्थानिक महिलेवर दोन मगरींनी अचानक हल्ला केला. विश्रांती गावकर नावाच्या या महिलेने ताबडतोब मदतीसाठी आवाज देताच केवळ ५० मीटरवर असलेले तिचे कुटुंबीय मदतीसाठी धावून आले आणि म्हणून तिचा जीव वाचला. या घटनेमुळे मात्र स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या नदीत किमान १२ ते १५ मगरी आहेत. गोव्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या, वाघ, गवे अशा हिंस्त्र जनावरांचा स्थानिकांवर हल्ला सुरुये. पण मगरींनी केलेल्या या अचानक हल्ल्याने स्थानिक पुन्हा एकदा घाबरले असून ते वन विभागाकडे मदतीची विनवणी करतायत.

हल्ला कसा झाला?

हल्ला झालेल्या महिलेचं नाव विश्रांत गावकर असून सध्या तिच्यावर मडगाव येथे उपचार सुरू आहेत. प्रकाश नाईक तिचे दिर आहेत आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कपडे धुवायला गेलेल्या विश्रांती यांनी अचानक आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि यामुळे घाबरून ते पत्नीसह तिच्या मदतीला धावून गेले.

विश्रांती नाईक दोन मगरींच्या तावडीत सापडल्या होत्या, एवढ्यात प्रकाश नाईक आणि त्यांची पत्नी मदतीसाठी धावून आले. विश्रांती नाईक यांना मगरीच्या तावडीतून सोडवण्यासाठी ओढून काढल्याचं नाईक म्हणलेत. जवळच बांधलेल्या एक बंदाऱ्यामुळे मगरी त्रास निर्माण करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि हा बंदारा हातवणं हाच एकमेव पर्याय असल्याचं ते म्हणलेत.

crocodile fear in village Goa
Ponda Murder Case: मेव्हण्याने दारुच्या नशेत केला दाजीचा खून; कोडार - फोंडा येथील घटनेने खळबळ

या भागात सध्या वन्य जीवांचा संचार वाढलाय सोबतच जवळ असलेल्या बंदाऱ्यामुळे नदीचं पाणी देखील वाढलं आहे. काहीवेळा नळाला पाणी न आल्यास स्थानिकांना नदीच्या पाण्याचा वापर करावा लागतो त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष द्यावं असं आतिष गावकर (वकील) यांचं म्हणणं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com