Goa News: गोवा काँग्रेसचा 2027 साठी 'अबकी बार 30 पार'चा नारा, निरंकाल-दाभाळ येथे आढळली मगर; ठळक घडामोडी

Goa Today's 05 June 2024 Live News: गोव्यातील गुन्हे, राजकारण, पर्यटन यासह विविध क्षेत्रातील बातम्यांच्या ताज्या अपडेट्स.
Goa News: गोवा काँग्रेसचा 2027 साठी 'अबकी बार 30 पार'चा नारा, निरंकाल-दाभाळ येथे आढळली मगर; ठळक घडामोडी

Goa Congress: गोवा काँग्रेसचा 2027 साठी 'अबकी बार 30 पार'चा नारा

दक्षिण गोव्यात ९ मतदारसंघांमध्ये कॉंग्रेसला मोठे मताधिक्य. उत्तर गोव्यातही कॉंग्रेसचे अस्तित्व शाबूत. २०२७मध्ये कॉंग्रेसचा नारा 'अबकी बार ३० पार'. गोव्यातील इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते युरी आलेमावांचा नारा.

Vijai Sardesai: गोव्यात भाजपच्या लोकांनीच भाजपला नाकारले! - सरदेसाई

भाजप आता पार्टी वीथ डिफरन्स राहिलेली नाही. आता ती डिफरंट पार्टी झालीय. ही गोष्ट आता सर्वांना कळून चुकलीय. भाजपच्या लोकांनीच भाजपला मतदान केलेले नाही. विजय सरदेसाईंचे प्रतिपादन.

Yuri Alemao: पर्यावरणाचे रक्षण आणि गोवा वाचवण्यासाठी आमचा लढा सुरू ठेवूया - युरी आलेमाव

आपली जीवनदायीनी आई म्हादईच्या रक्षणासाठी आपण सर्वजण आपला लढा सुरूच ठेवू या, विनाशकारी 3 रेखीय प्रकल्पांविरुद्ध आवाज उठवूया, आयआयटी प्रकल्प आणि फिल्म सिटीला विरोध करून सांगे आणि काणकोण येथील हरित जमीन व जैवविविधता वाचवण्यासाठी आपण स्वतःला वचनबद्ध करूया.

गोव्याचे रक्षण करूया, असे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे.

Crocodile Found In Goa: निरंकाल-दाभाळ येथे आढळली मगर

निरंकाल - दाभाळ येथे आढलेल्या महाकाय मगरला सुखरुप पुन्हा फोंडा वन खात्याकडे सोपविण्यात आले.

Cashew Production In Goa: गोवा सरकार शेतकऱ्यांना काजू रोपे पुरवणार - मुख्यमंत्री

काजू आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणावर काजू लागवडीची गरज. सरकार शेतकऱ्यांना काजू रोपे पुरवणार, असे आश्वासन डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे.

Dongurlim-Thane: डोंगुर्ली - ठाणे पंचायतीला घनकचरा व्यवस्थापनासाठी पुरस्कार

डोंगुर्ली - ठाणे पंचायतीला घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुरस्कार देऊन गौरवले आहे. पर्यावरण दिनानिमित्ताने पुरस्काराचे वितरण.

Calangute, Beach: बीचवर कार घेऊन जाणे पुणेकराला भोवले

कळंगुट बीचवर कार घेऊन जाणे पुणेकराला चांगलेच भोवले असून, पोलिसांनी MH14 HK 0191 या वाहन धारक संदीप दाभाडेवर कारवाई केली आहे. दाभाडे यांची कार कळंगुट येथील एका रिसॉर्टजवळ रुतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com