Development Fund: मोदी सरकारकडून गोव्याला 667.91 कोटी; विकासकामांना मिळणार गती

Goa Development Fund: मोदी सरकारनं विकास निधीचा हप्ता मंजूर केला आहे. छोट्याशा गोव्याला 667.91 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
Development Fund: मोदी सरकारकडून गोव्याला 667.91 कोटी; विकासकामांना मिळणार गती
PM ModiDainik Gomantak
Published on
Updated on

Modi Government Approves Development Fund For Goa

मोदी सरकारनं विकास निधीचा हप्ता मंजूर केला आहे. छोट्याशा गोव्याला 667.91 कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात नेहमीप्रमाणे सर्वाधिक 31039.84 कोटींचा निधी उत्तर प्रदेशला दिला आहे. भांडवली खर्चाला गती देण्यासोबतच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी मोदी सरकारने राज्य सरकारांना 1,73,030 कोटी रुपये दिले आहेत. डिसेंबर 2024 मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेला कर परतावा 89,086 कोटी इतका होता.

विकास कामे

राज्यांना राज्यातील विकास कामांना गती देण्यासाठी मोदी सरकार वेळोवेळी मदत करत असते. याशिवाय, राज्य सरकारे केंद्राकडून कर्जही घेत असते. या पैशांमधून राज्य सरकारे आपल्या राज्यातील पायाभूत विकास कामांना गती देण्यासोबतच कल्याणाशी संबंधित कामेही करतात. दरम्यान, भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, तसेच विकास (Development) आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक विकास निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

Development Fund: मोदी सरकारकडून गोव्याला 667.91 कोटी; विकासकामांना मिळणार गती
Fund Appropriation Case: गोवा कृषी खात्‍याच्या कोट्यवधी निधीचा अपहार? खात्‍याने काय दिला खुलासा

अनुदानाची मागणी

दरम्यान, सावंत सरकारने विविध विकास प्रकल्पांच्या विकासासाठी 32 हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी मोदी सरकारकडे केली आहे. या संदर्भात 16व्या वित्त आयोगाने सरकारकडे शिफारस करावी, अशी विनंती सावंत सरकारकडून करण्यात आली आहे. दोनापावला येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत गोव्याच्या (Goa) प्रगतीसाठी विविध योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गोव्यातील पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यटन तसेच जलसंवर्धन या सारख्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com