Goa Bribery Case: 'एटीएस'च्या 5 पोलिसांची कॅसिनो व्यापाऱ्याला लाचेसाठी धमकी...

केंद्रीय मंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे तक्रार केल्याने गोवा पोलिस दलात खळबळ
Goa Bribery Case
Goa Bribery CaseDainik Gomantak

Goa Bribery Case: गोवा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) कॅसिनो व्यापाऱ्याकडून लाच मागितल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहचले आहे. थेट केंद्रीय मंत्र्यांनी दखल घेतल्याने गोवा पोलिस दलात खळबळ माजली आहे.

एटीएसच्या एकूण पाच कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. यात तीन हवालदार आणि दोन पोलिस कॉन्स्टेबल आहेत.

Goa Bribery Case
Mauvin Gudinho: टॅक्सीवाले माफियांप्रमाणे वागताहेत, वाहतूक मंत्र्यांचे वक्तव्य

विशेष म्हणजे या लाच प्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेला कर्मचारी रजेवर होता. त्याने तो स्वतः पोलिस उपनिरिक्षक असल्याचे सांगून लाच मागितली होती. रजेदिवशीही तो लाच मागण्यासाठी आला होता. दरम्यान, हे प्रकरण अंगलट येऊ शकते, अशी शक्यता वाटू लागल्याने एक कर्मचारी तब्येतीचे कारण देत रजेवर गेल्याचे समजते.

शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता एटीएसच्या या पाच कर्मचाऱ्यांनी कॅसिनो व्यवसायाशी संबंधित व्यापाऱ्याला धमकी देत त्याच्याकडून 6.5 रूपये लाच मागितली. संबंधित व्यापाऱ्याने 1.5 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. परंतु, एटीएसच्या कर्मचाऱ्यांनी कमी रक्कम स्विकारण्यास नकार दिला.

संबंधित व्यापाऱ्याने या सगळ्या प्रकाराचा पोलिसांच्या नकळत व्हिडिओ केला आणि तो आपल्या साथीदाराला पाठवला. त्याच्या साथीदाराने हा व्हि​डिओ दिल्लीतील केंद्रीय मंत्र्यांना पाठवला. संबंधित मंत्र्याने थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला. त्यामुळे​ आता दोषी पोलिसांवर लवकरच कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com