40 हजार ठेवीदारांनी दाव्‍यांकडे फिरवली पाठ

मडगाव अर्बन बॅंकेचे लॉकर्सही पडून, अर्जांची छाननी सुरू
Why depositors of Margao Urban Bank do not come forward to file claims
Why depositors of Margao Urban Bank do not come forward to file claimsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दिवाळखोरीत गेलेल्या मडगाव अर्बन बॅंकेच्या (Margao Urban Bank) लिक्विडेटरनी बॅंकेत ठेवी असलेल्या ठेवीदारांना त्या परत मिळविण्यासाठी दावे करण्यास दिलेली दोन महिन्यांची मुदत 31 आक्टोबर रोजी संपलेली. तरीही अजून सुमारे 40 हजार जणांनी ते दावे न केल्याने हे ठेवीदार कुठे गेले? असा प्रश्र्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे पाचशेपेक्षा अधिक लॉकर्सच्‍या चाव्‍या संबंधितांनी परत न केल्याने कुतुहल निर्माण झाले आहे.

मडगाव अर्बन बॅंक दिवाळखोरीत गेली त्या दिवशी तिचे 56635 ठेवीदार होते. त्यानंतर लिक्विडेटर एस. व्ही. नाईक यांनी नियुक्त केलेले विशेष अधिकारी किशोर आमोणकर यांनी त्यांना ठेवी परत मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. त्यासाठी प्रथम एक महिन्याची मुदत दिली व नंतर ती आणखी एका महिन्याने वाढविली ती 31ऑक्टोबर रोजी संपली. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सप्टेंबर मध्ये 5053, तर ऑक्टोबरमध्ये 3 हजार मिळून एकूण आठ हजार दावे केले गेले. आता त्यांची छाननी करून पाच लाखांची ठेव असलेल्यांचे दावे ठेवी विमा पत हमी महामंडळाकडे पाठविले जातील. साधारण 15 नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया सुरू केली जाईल व साधारण वर्षअखेरीस संबंधितांना त्यांच्या ठेवी परत मिळतील, अशी माहिती दिली.

Why depositors of Margao Urban Bank do not come forward to file claims
Goa: दिव्यांग असलो तरी स्वयंपूर्ण...

500 लॉकर्स बंदच

बॅंकेकडील साधारण पाचशे लॉकर्सच्‍या किल्ल्‍या संबंधितांनी अद्याप परत केलेल्‍या नाहीत. त्यामुळे सर्व सोपस्कार करून ते बॅंकेला उघडावे लागणार आहेत. विविध शाखांत 800 लॉकर्स होते. पण, बॅंक दिवाळखोरीत गेल्यानंतर केलेल्या आवाहनानुसार तीनशे जणांनी त्‍याच्‍या चाव्‍या व्‍यवस्‍थापकांकडे सुपुर्द केल्‍या होत्‍या. त्यामुळे उरलेले लॉकर्स उघडले गेलेच नाहीत.

Why depositors of Margao Urban Bank do not come forward to file claims
लोबोंची हॅट्‌ट्रिक उधळण्‍यास स्‍वकियांकडूनच व्‍यूहरचना?

मुदतवाढ देणे शक्‍य

ठेवीदार दावे दाखल करण्यासाठी पुढे का येत नाहीत ते कळायला मार्ग नाही. लिक्विडेशन प्रक्रियेप्रमाणे त्यांच्याकडून दावे येणे आवश्यक आहे. ही मुदत आणखी वाढविणे शक्य आहे. पण, त्यांना ते दावे मुख्य कार्यालयात येऊन सादर करावे लागतील. भाड्याच्या जागेतील बॅंक शाखा बंद करून तेथील सामान आता मुख्य कार्यालयात हलविले जाईल, असेही आमोणकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com