Goa: दिव्यांग असलो तरी स्वयंपूर्ण...

विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंना मडगावात चांगला प्रतिसाद
Goa: दिव्यांग असलो तरी स्वयंपूर्ण...
Goa: दिव्यांग असलो तरी स्वयंपूर्ण...Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: ढवळी येथील लोकविश्वास प्रतिष्ठान स्कूलमधील दिव्यांग मुलांनी लक्ष्मी नारायण ट्रस्टच्या सहाकार्याने दिवाळीनिमित्त एकाहून एक सुंदर कलात्मक तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मडगावमधील लिंगायत सभागृहात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘आम्ही दिव्यांग असलो, तरी आम्ही स्वयंपूर्ण आहोत’ हेच या विशेष मुलांनी दाखवून दिलेले आहे.

लक्ष्मी नारायण ट्रस्ट आठरा वर्षावरील दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी कार्यरत आहे. ट्रस्ट गेल्या काही वर्षापासून अशा मुलांसाठी प्रोत्साहन तसेच आर्थिक मदत पुरविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिलेले आहे. दिव्यांग मुलांनी यंदा दिवाळीनिमित्त अनेक वस्तू तयार केल्या होत्या तर यात सजावटीच्या पणत्या, रंगीत मेणबत्त्या, सजावटीचे लहान मोठ्या आकाराचे आकाशदिवे, जेलीची मेणबत्ती, सुंगधी मेणबत्ती व इतर सजावटीच्या वस्तू तयार केल्या होत्या, अशी माहिती लक्ष्मी नारायण ट्रस्टचे व्यवस्थापकीय ट्रस्टी डॉ. निलेश उजगावकर यांनी दिली.

वस्तू बनविण्यासाठी आलेल्या खर्च प्रदर्शनातून मिळणाऱ्या रक्कमेद्वारे वजा करून राहिलेली रक्कम मुलांच्या खात्यात जमा केली आहे. अठरा वर्षावरील दिव्यांग मुलांना आर्थिक सहाय्यता मिळण्यासाठी हे प्रदर्शन लाभदायक ठरणार आहे.

Goa: दिव्यांग असलो तरी स्वयंपूर्ण...
पोकळ घोषणांचा सप्ताह

23 मुलांची कल्पकता

या प्रदर्शनात लोक विश्वास प्रतिष्ठानमधील 23 मुलांनी कल्पकतेने तयार केलेल्या वस्तूची विक्री करण्यात आली. मुलांनी बनविलेल्या या वस्तू माफक दरात विक्री करण्यात आल्या असून तयार केलेल्या पणत्या व मेणबत्त्या पर्यावरणपूरक आहेत, असे निलेश उसगावकर यांनी सांगितले. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रदर्शनला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून यंदाही या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com