लोबोंची हॅट्‌ट्रिक उधळण्‍यास स्‍वकियांकडूनच व्‍यूहरचना?

जवळच्‍यांनीही साथ सोडल्‍याने अडचणींत वाढ
Goa Politics Minister Michael Lobo
Goa Politics Minister Michael LoboDainik Gomantak
Published on
Updated on

कळंगुट: कळंगुट विधानसभेची जागा सलग दोन वेळा आपल्या ताब्यात ठेवून यंदा तिसऱ्या खेपेस निर्विवादपणे निवडून येण्‍याचा व या भागात ऐतिहासिक हॅट्‌ट्रिक साधण्याचा दावा करणारे स्थानिक आमदार MLA तथा कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो ( Minister Michael Lobo) यांची साथ अलीकडे त्‍यांचे जवळचे लोक सोडत असल्याने त्यांच्या अस्तित्‍वाला कधी नव्हे ते जबर आव्हान निर्माण (Goa Politics) झाले आहे.

Goa Politics Minister Michael Lobo
‘आप’च्‍या तीर्थयात्रा हमीलाही

कळंगुटचे माजी सरपंच अँथनी मिनेझिस हे मायकल लोबो यांचे अत्यंत विश्‍‍वासातील व जवळचे मानले जायचे. परंतु तीन महिन्यांपूर्वीच त्‍यांनी लोबो तसेच भाजपची साथ सोडून काँग्रेस पक्षाशी घरोबा साधला आहे. या धक्‍क्‍यातून सावरत असतानाच त्‍यांच्‍याच पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश केलेले व नंतर भाजपचीच कास धरून कळंगुट पंचायतीच्या उपसरपंचपदापर्यंत मजल मारलेले सुदेश मयेकर यांनी कालच आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. त्‍यांचीही साथ तुटल्‍याने लोबोंच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत.

Goa Politics Minister Michael Lobo
गोव्यात आज सर्वत्र 'नरकासुरांचा राज'

विशेष म्‍हणजे या भागातील भाजप गट समितीचे दोन वेळा नेतृत्व केलेले गजानन शिरोडकर यांनी ऑक्टोबरच्या मध्यावर पक्षाच्या मूळ सदस्यत्वाचा राजीनामा देत वेगळी चूल थाटल्याने लोबो तसेच त्‍यांच्‍या कार्यकर्त्यांच्‍या भुवया उंचावल्या आहेत. शिरोडकर हे सक्रिय राजकारणापासून सध्या दूर असले तरी कळंगुट आणि परिसरातील अनेक देवस्थाने तसेच सामाजिक संस्थांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. म्‍हणूनच शिरोडकर यांचे दूर जाणे मंत्री लोबो यांना महागात पडू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

दरम्यान, 2012 आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकांत स्थानिक मतदारांच्या गळ्यातील ताईत बनलेले मायकल लोबो यांच्यावर 2021 च्‍या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशी ताटातुटीची वेळ का आलीय, याचे कोडे मतदारांबरोबरच खुद्द लोबो यांनाही पडले असल्‍याचे त्यांचे जवळचे लोक सांगतात. गेली दहा वर्षे भाजपमध्‍ये राहून राजसत्तेचा भोग घेत असतानाही पक्षाच्या वरिष्ठांशी फारकत घेत स्वत:लाच पुढे पुढे करणारे मायकल लोबो सध्‍या राजकीय चक्रव्यूहात अडकले आहेत. त्‍यामुळे पक्षानेही त्‍यांना एकटे पाडण्‍याचा प्रयत्‍न चालवला आहे, असे येथील लोकांचे म्‍हणणे आहे. ‘एकवेळ विरोधक परवडला, परंतु घरभेदी नको’ या उक्तीला अनुसरून लोबोंना न दुखवता त्‍यांचा कळंगुट मतदारसंघातून काटा काढण्याचा भाजपचा डाव असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

संतोष गोवेकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com