Goa Police News: गोव्यात ड्रग्ज नेमकं पुरवतो कोण? पाच वर्षात 947 खटले; पण माग काढण्यात पोलिस अपयशी...

बेकायदा बंदुकीच्या केवळ 9 टक्के प्रकरणांत स्त्रोत शोधण्यात यश
Goa Police Fail to Track Drug Suupliers:
Goa Police Fail to Track Drug Suupliers: Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police Fail to Track Drug Suupliers: गेल्या साडेपाच वर्षांत गोवा पोलिसांना नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायद्यांतर्गत नोंदवलेल्या कोणत्याही गुन्ह्यांमध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा करणारे किंवा बेकायदेशीर ड्रग्जच्या स्रोतांचा माग काढता आलेला नाही. त्यामुळे गोव्यात नेमकं ड्रग्ज पुरवतो कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, बेकायदेशीर बंदुकांशी संबंधित प्रकरणांमध्ये पोलिसांना केवळ 9 टक्के प्रकरणांमध्ये पुरवठादार आणि बेकायदेशीर बंदुकांचे स्रोत शोधण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. हळदोणाचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी याबाबत प्रश्न विचारला होता.

Goa Police Fail to Track Drug Suupliers:
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डीझेल दरांत घट; दक्षिण गोव्यातील किंमती स्थिर

अमली पदार्थांच्या प्रकरणांबाबत सावंत यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, 2018 ते जून 2023 या कालावधीत एनडीपीएस कायद्यांतर्गत 947 प्रकरणे नोंदवण्यात आली. तथापि, पोलिसांना कोणत्याही प्रकरणात अंमली पदार्थ पुरवठादार किंवा बेकायदेशीर ड्रग्सच्या स्त्रोतांचा माग काढता आला नाही.

2018 मध्ये एकूण 222, 2019 मध्ये 219, 2020 मध्ये 148, 2021 मध्ये 121, आणि 2022 मध्ये 154 प्रकरणे नोंदवण्यात आली. या वर्षात जानेवारी ते जून 2023 पर्यंत NDPS कायद्यांतर्गत एकूण 83 प्रकरणे नोंदवण्यात आली.

947 प्रकरणांपैकी 739 खटले प्रलंबित आहेत, तर 117 प्रकरणांचा तपास सुरू आहे. 8 प्रकरणांमध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे, तर 39 प्रकरणांत दोषी ठरले आहेत. 25 प्रकरणांमध्ये आरोपींवरील खटले मागे घेतले आहेत.

Goa Police Fail to Track Drug Suupliers:
Banastarim Bridge Accident: बाणास्तरी अपघातातील जखमी वृद्धाने हात, पाय गमावला; काहींची प्रकृती चिंताजनक, कुटुंबीय हवालदिल

तपासादरम्यान, आरोपी व्यक्ती सहकार्य करत नाही किंवा स्त्रोत उघड करत नाही. तथापि, पोलिसांनी ड्रग्ज तस्करांचा मागचा-पुढचा संबंध शोधून काढला आहे.

दरम्यान, 2018 ते जून 2023 या कालावधीत पोलिसांनी बेकायदेशीर बंदुकांशी संबंधित 57 गुन्हे दाखल केले. यातील पाच प्रकरणांमध्ये पोलिसांनी बेकायदेशीर बंदुकांचा पुरवठादार आणि स्त्रोत यांचा माग काढला आहे.

2018 मध्ये याबाबतची एकूण 8, 2019 मध्ये 10, 2020 मध्ये 17, 2021 मध्ये एकूण 13, 2022 मध्ये 6 तर यावर्षी जूनपर्यंत असे 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

57 पैकी 48 खटले प्रलंबित आहेत, तर दोन प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता झाली असून एका प्रकरणात आरोपींना शिक्षा झाली आहे. तीन प्रकरणे बंद करण्यात आली आहेत आणि तीन प्रकरणे तपासाधीन आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com