Panjim: अंधारात होते पाप! 'स्मार्ट पणजी'साठी 200 वर्ष जुन्या झाडाची रात्रीच्या वेळेस कत्तल

Smart City Panaji: सांतिनेज मधील वडाचे झाड हटविण्यात आले त्याचा व्हिडिओ सध्या समोर आला असून, पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
Smart City Panaji
Smart City PanajiDainik Gomantak

Smart City Panaji

स्मार्ट सिटी पणजीच्या कामासाठी अडथळा ठरणारी झाडे हटवली जात आहेत. यात सांतिनेज येथील 200 वर्षे जुने वडाचे झाड तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी जोरदार विरोध केला. मात्र, अखेर दिवसभराच्या विरोधानंतर अखेर रात्रीच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात या झाडाची कत्तल करण्यात आली.

सांतिनेज मधील वडाचे झाड हटविण्यात आले त्याचा व्हिडिओ सध्या समोर आला असून, पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

स्मार्ट सिटीच्या कामासाठी सांतिनेज येथील जुन्या वडाचे झाड तोडण्यास सुरुवात केल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी एकच गोंधळ घातला. गोवा ग्रीन ब्रिगेड आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी येत वृक्ष तोडीचे काम बंद पाडले. झाडे पाडण्यासाठी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडे परवानगी नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, यावेळी झाड तोडण्याचे काम थांबविण्यात आले पण मध्यरात्रीच्या सुमारास वडाचे झाड हटविण्यात आले. यामुळे आता पर्यवारणप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.

Smart City Panaji
New York: अजब योगायोग! स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर वीज कोसळली अन् दुसऱ्याच दिवशी भूकंपाने न्यूयॉर्क हादरले

दोनशे वर्षे जुने वृक्ष पाडण्यास सुरुवात केल्यानंतर मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी घटनास्थळी दाखल झाले. सामजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमींनी वृक्ष तोडण्यास विरोध केला पण, पोलिस बंदोबस्तात वडाच्या झाडाची कत्तल करण्यात आली.

गोवा ग्रीन ब्रिगेड झाडांची कत्तल रोखण्यासाठी स्मार्ट सिटीविरोधात याचिका दाखल करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com