Goa Congress Loksabha Candidate Declared: अखेर मुहूर्त मिळाला! गोवा लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा

Goa Congress Loksabha Candidate Declared: काँग्रेसकडून आज सकाळी सहा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली त्यात गोव्यातील दोन जागांचा समावेश आहे.
Goa Congress Loksabha Candidate
Goa Congress Loksabha CandidateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress Loksabha Candidate Declared

अखेर काँग्रेसकडून आगामी लोकसभेसाठी गोव्यातील उमेदवारांची घोषणा केली असून, उत्तरेत रामकांत खलप तर दक्षिण गोव्यातून विरीयातो फर्नांडिस यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून आज सकाळी सहा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली त्यात गोव्यातील दोन जागांचा समावेश आहे.

उमेवादर निश्चितीसाठी काँग्रेसच्या नेत्यांची शुक्रवारी दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. यात गोव्यातील महत्वाचे नेते तसेच, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. शुक्रवारी रात्री उशीरा उमेदवारांची घोषणा होणे अपेक्षित होते.

अखेर शनिवारी सकाळी काँग्रेसने राज्यातील दोन्ही जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली असून, उत्तरेत खलप तर दक्षिणेत विरीयातो फर्नांडिस यांना संधी देण्यात आली आहे.

Goa Congress Loksabha Candidate
Panjim: अंधारात होते पाप! 'स्मार्ट पणजी'साठी 200 वर्ष जुन्या झाडाची रात्रीच्या वेळेस कत्तल

फ्रान्सिस सार्दिन यांचा पत्ता कट

दक्षिणेत काँग्रेसचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांना पुन्हा एकदा संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात असताना, यावेळी त्यांचा पत्ता कट झाल्याचे दिसत आहे. त्याऐवजी काँग्रेसने कॅथलिक नेते कॅप्टन विरीयातो फर्नांडिस यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील लोकसभा लढतीचे चित्र स्पष्ट

गोव्यातील लोकसाभा लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, उत्तरेत श्रीपाद नाईक (भाजप) विरुद्ध रमाकांत खलप (काँग्रेस) आणि मनोज परब (आरजी) तर दक्षिणेत पल्लवी धेंपे (भाजप) विरुद्ध कॅप्टन विरीयातो फर्नांडिस (काँग्रेस) आणि रुबर्ट पेरेरा (आरजी) अशी त्रिशंकू लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com