Datta Naik: 'मंदिर, मठात भक्तीच्या नावाखाली लूट सुरूये' असं विधान करणारे दत्ता नायक कोण आहेत?

Who Is Datta Damodar Naik: मंदिर, मठ, पर्तगाळी मठांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन दत्ता नायक वादात सापडले आहेत.
Datta Naik: 'मंदिर, मठात भक्तीच्या नावाखाली लूट सुरूये' असं विधान करणारे दत्ता नायक कोण आहेत?
Datta Damodar NaikDainik Gomantak
Published on
Updated on

Who Is Datta Damodar Naik?

मडगाव: मंदिर आणि मठांना लुटारु म्हटल्याने मडगावाचे उद्योजक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक दत्ता दामोदर नायक सध्या वादात सापडले आहेत. नायक यांच्या विरोधात विविध ठिकाणी पोलिस तक्रार देखील दाखल झालीय. नायक यांनी अटकपूर्व जामीनसाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी गुरुवारी (०९ जानेवारी) दक्षिण गोवा सत्र न्यायालयात पार पडली.

या अर्जावरील निकाल उद्यापर्यंत (१० जानेवारी) राखून ठेवण्यात आला आहे पण मध्यंतरीच्या काळात त्यांना अंतरिम जामीन द्यावा ही मागणी न्यायलयाने मान्य न केल्याने त्यांना अटक तर केली जाणार नाही ना असा संभ्रम निर्माण झाला आहे.

दत्ता दामोदर नायक कोण आहेत?

मडगावमधील प्रसिद्ध उद्योजक म्हणून ओळखले जाणारे नायक उत्कृष्ट लेखक देखील आहेत. त्यांची मराठी, कोकणी आणि इंग्रजी भाषेतील अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कालीघाट ते करुणाघाट, इकेबाना, अरेबियन डेज, आत्मदीपो भव, जाय की जूय? अनकॉमन वेल्थ ही काही त्यांची गाजलेली पुस्तके आहेत. २००६ साली त्यांनी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राजकीय कारकिर्द

राजकारणात देखील दत्ता नायक सक्रिय होते. काँग्रेसमध्ये कार्यरत होण्यापूर्वी त्यांनी भाजप आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या युतीसाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर त्यांनी १९९२ च्या सुमारास काँग्रेससाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनीच मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, गोवा काँग्रेस अध्यक्षपदासाठी देखील त्यांच्या नावाची चर्चा होती. नायक यांनी गोव्यात समता आंदोलन उभारले होते. अलिकडे नायक राजकारणात जास्त सक्रिय नसतात.

Datta Naik: 'मंदिर, मठात भक्तीच्या नावाखाली लूट सुरूये' असं विधान करणारे दत्ता नायक कोण आहेत?
Datta Naik: लेखक दत्ता नायक यांच्या अडचणीत वाढ; धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आता गोवा पुरोहित संघाकडून पोलिस तक्रार

दत्ता नायक यांच्याशी संबधित वाद नक्की काय आहे?

७० व्या वाढदिवसानिमित्त गेल्या काही दिवसांपूर्वी एका खासगी वृत्तवाहिनीने नायक यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत नायक यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केले. राज्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु असल्याचे मत त्यांनी मांडले.

याचवेळी मंदिर, मठ पर्तगाळ मठात भक्तीच्या नावाखाली भरपूर पैसे लुटतात, असे नायक म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय नेते, गोव्यातील मंदिरांचे संचालक आणि पुजाऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. सुरुवातीला काणकोण नंतर मडगाव आणि आता फोंड्यात पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. गोवा पुरोहित संघाकडूनही त्यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल झालीय. यामुळे त्यांना अटक होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Datta Naik: 'मंदिर, मठात भक्तीच्या नावाखाली लूट सुरूये' असं विधान करणारे दत्ता नायक कोण आहेत?
धार्मिक वक्तव्य करणं भोवणार? दत्ता दामोदर नायक यांच्यावर अटकेची टांगती तलवार, अंतरिम जामीनावर शुक्रवारी सुनावणी

भाजपने काय प्रतिक्रिया दिली

दत्ता नायक यांनी मुलाखतीत केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ भाजपचे माजी खासदार नरेंद्र सावईकरांनी फेसबुकवर पोस्ट करुन आक्षेप नोंदवला. "आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे हा ज्याच्या त्याच्या विश्वास व श्रद्धेचा भाग. आपल्या विचारावर ठाम राहणे व त्याचा प्रचार करणे हे देखील योग्यच. पण त्यासाठी देवळे व मठ/मंदिरांनांच का म्हणून हिणवावे?", असे सावईकर म्हणाले.

दत्ता नायक यांची पहिली प्रतिक्रिया

सावईकरांच्या या फेसबुक पोस्टवर दत्ता नायक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "देऊळ लूट नाही करतायेत हे मान्य करुया. हे भाजप सरकार आम्हाला लुटतंय, त्यावर मि. सावईकर तुम्ही शांत का आहात?" असा सवाल दत्ता नायक यांनी उपस्थित केला.

काँग्रेसकडून सत्कार

वयाची सत्तरी पार करणाऱ्या दत्ता दामोदर नायक यांचा काँग्रेसकडून गेल्या रविवारी सत्कार करण्यात आला. काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्या हस्ते नायक यांचा गौरव करण्यात आला. या समारंभावर भाजपने टीका केली. नायक यांच्या वक्तव्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काँग्रेसकडून नायक यांच्या प्रकरणावर अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.

Datta Naik: 'मंदिर, मठात भक्तीच्या नावाखाली लूट सुरूये' असं विधान करणारे दत्ता नायक कोण आहेत?
Datta Naik: दत्ता नायक पुरावा देऊ शकतील का? 'सोशल मीडिया'वर जोरदार चर्चा

काहींनी दर्शवला पाठिंबा

समतावादी चळवळीतील कार्यकर्ते रमेश गावस यांनी दत्ता नायक यांचा हा विचार उचलून धरताना तिरूपती बालाजी मंदिरात भक्‍तांकडून ज्‍या रितीने पैसे वसूल केले जातात, त्‍याला लूट म्‍हणायची नाही तर आणखी काय म्‍हणायचे, असा सवाल केला. तर माेहनदास लोलयेकर यांनीही नायक यांना पाठिंबा देताना, दत्ता नायक यांचे काय चुकले, असा सवाल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com