पणजी महापालिकेने (Panajim Municipal Corporation) शहरात उघड्यावर, पदपथावर (Footpath)व इतरत्र राहणाऱ्या लोकांचा सर्वे केला असता 29 जण उघड्यावर राहात असल्याचे आढळले. महापौर रोहित मोन्सेरात यांच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्तांसह काही अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या लोकांनी एक तर त्यांच्या गावी जावे किंवा निवाराघरात राहावे, असे दोन पर्याय महापालिकेने त्यांना दिले होते. त्यापैकी दहा ते बाराजण त्यांच्या गावी जाण्यास तयार झाले. मात्र, उर्वरितांपैकी बरेचजण दुसऱ्या दिवशी गायब झाल्याचे दिसून आल्याने ते कुठे गेले, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. (Where homeless people living in city of Panaji went)
खरे तर हे लोक अशी काही मोहीम वगैरे झाली, की काही दिवस गायब होतात. फार तर ते दुसऱ्या गावात, शहरात जातात आणि प्रशासनाचा कानाडोळा झाला, की पुन्हा अवतरतात. कोरोना महामारीपूर्वी एकाने टेम्पोभर लोक शहरात जागोजागी भीक मागण्यासाठी बसवल्याचे आढळले होते. मात्र नंतर ते गायब झाले. त्यामुळे त्यांना केवळ पणजीतून नव्हे, तर राज्यभरातून त्यांच्या गावी पाठवण्याची व्यापक मोहीम सरकारने राबवली पाहिजे. मात्र, जे कोणी गावी जाण्यासाठी तयार झाले आहेत, त्यांना पाठवण्याचा खर्च उचलून महापालिकेने चांगले कार्य केल्याचा दुवा घेतला आहे.
29 बेघरांपैकी काहीजण गायब
पणजी महापालिकेने शहरी भागात घर नसल्याने उघड्यावर पदपथ व इतरत्र राहणाऱ्या लोकांचा सर्वे केला असता 29 नागरिक घर नसल्याने उघड्यावर राहात असल्याचे स्पष्ट झाले होते. या नागरिकांनी एक तर त्यांनी त्यांच्या गावी जावे किंवा निवाराघरात राहावे, असे दोन पर्याय महापालिकेने दिले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी यातील बरेचजण गायब झाल्याचे दिसून आले.
पणजी महापालिकेने 5 ते 9 ऑगस्ट या काळात हा सर्वे केला. महापौर रोहित मोन्सेरात यांच्या सूचनेनुसार महापालिका आयुक्त आग्नेल फर्नांडिस, अभियंते विवेक पार्सेकर आणि महापालिकेच्या इतर अधिकाऱ्यांनी पणजी परिसरात फिरून पाहणी केली. पदपथावर झोपणारे 29 बेघर नागरिक आढळल्याचे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
या 29 नागरिकांना पालिकेच्या खर्चाने त्यांच्या गावी पाठवण्याची तयारी केली होती. त्यातील दहा ते बाराजण तयार झाले. जे गावी जाण्यास तयार नाहीत, त्यांना निवारा केंद्रांत पाठवणार असल्याचे महापालिकेने सांगितले. मात्र, काल मंगळवारी या लोकांचा शोध घेतला असता ते गायब झाल्याचे उपमहापौर वसंत आगशीकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.