Goa : काणकोणात ऑगस्टचे रेशन रखडले

Goa : धान्‍य दुकानदारांची साठवणुकीबाबत गैरसोय
Goa : Ration Shops stock.
Goa : Ration Shops stock.Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण : काणकोणात (Cancona) ऑगस्ट महिन्यात देण्‍यात येणारा रेशन कोटा (Ration Stock) अद्याप वितरित झालाच नाही. प्रत्येक महिन्याला १० तारखेपूर्वी रेशन कोट्याची स्वस्त धान्य दुकानदार उचल करीत होते. त्याचबरोबर समाजातील दुर्बल घटकांना दरडोई पाच किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहेत. जुलै व ऑगस्ट महिन्याचा हा कोटा एकदमच स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आला आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याचा कोटा आल्याशिवाय मोफत तांदूळ शिधापत्रिकाधारकांना न देण्याचे निर्देश स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आले आहे. ऑगस्‍ट महिन्‍यात देण्‍यात येणारे तांदूळ निर्धारित दरानुसार (Rate) दिले जाणार आहेत. मात्र, या प्रयत्‍नात स्‍वस्‍त धान्‍य दुकानदारांची साठवणूक करण्‍याबाबत गोची झाली आहे.

Goa : Ration Shops stock.
Tarun Tejpal Case:सुनावणी ‘इन-कॅमेरा’ घेण्यास आक्षेप

...म्‍हणून घातली अट?
नागरी पुरवठा खात्याने दोन महिन्यांचे मोफत तांदूळ शिधापत्रिकाधारकांना मिळाल्यानंतर या महिन्याचे प्रतिमाणसी पाच किलो मिळणारे तांदूळ ते नेणार नाहीत. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना आर्थिक फटका बसेल, यासाठी ही अट घालण्यात आली आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात तांदूळ साठवून ठेवण्याची क्षमता नसलेल्या स्वस्त धान्य दुकानमालकांची गोची होणार आहे.

दोन-तीन दिवसांत धान्‍यपुरवठा
यासंदर्भात नागरीपुरवठा खात्याचे काणकोणमधील निरीक्षक जीवन मांद्रेकर यांच्याशी संपर्क साधला असता, ऑगस्ट महिन्याचा शिधापत्रिकेवरील कोटा येत्या दोन - तीन दिवसांत उपलब्ध होणार आहे. ही अडचण फक्त काणकोण तालुक्याचीच नसून अन्य तालुक्यातही अद्याप ऑगस्ट महिन्याचा कोटा पोहोचलेला नाही. सध्‍या राज्यात अन्नधान्य घेऊन येणारी वॅगन आली आहे. सर्व कामगार तो माल उतरविण्यासाठी व्यस्त आहेत. तसेच माल साठविण्यासाठी गोदामही नाहीत. त्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

असे होणार वितरण
दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिकाधारकांना नेहमीप्रमाणे प्रतिमाणशी महिना ५ किलो तांदूळ मिळणार आहेत, तर अंत्योदय कार्डधारकांना प्रतिमाणसी पाच किलो मोफत व तीन रूपये किलो प्रमाणे ३५ किलो तांदूळ मिळणार आहेत. दुर्बल गटातील शिधा पत्रिकाधारकांना प्रतिमाणसी जुलै व ऑगस्ट महिन्याचे दहा किलो मोफत तांदूळ पाच किलो असे पंधरा किलो तांदूळ मिळतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com