
सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांची पावलं गोव्याकडे वळतात पण गोवेकरांना कुठे जावं? आता काही दिवसांत मुलांना शाळेतून सुट्टी दिली जाईल आणि साधारण एक आठवडाभर तुमच्या हातात मोकळा असेल मग यावेळी कुठे फिरायला जायचं याचा विचार केला का? आज आम्ही तुम्हाला गोव्यासारखं आणखीन एक जागा सुचवणार आहोत जिथे जाऊन तुम्ही काहीवेळ आरामात परिवरासोबत घालवू शकता. आम्ही बोलतोय वर्कला बद्दल, अगदी गोव्यासारखं हे ठिकाण तुमच्या खिशाला परवडणारं आहेच सोबत इथलं वातावरण सुद्धा तुम्हाला साजेसं आहे. मग वर्कलाला जाऊन काय बघाल?
वर्कला हे केरळमधील तिरुवनन्तपुरम जिल्ह्यात स्थित आहे. वेगवेगळे समुद्रकिनारे आणि या किनारच्यावरील स्पोर्ट्स एक्टिविटीज पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतात. मुख्य म्हणजे वर्कलचे समुद्रकिनारे स्वच्छ असतात, आपल्याकडे किनाऱ्यावर असलेली गर्दी तिथे फारशी नसते आणि म्हणून शांतपणे पाण्याचा आणि भल्यामोठ्या समुद्राचा अनुभव घेऊ शकता.
या किनाऱ्यावर पँराग्लायडिंग,स्नॉर्केलिंग सारख्या आनंददायी ऍक्टिव्हिटीज करू शकता. आपल्या गोव्यात बटरफ्लाय बेटावर डॉल्फिन बघण्यासाठी जशी अनेक लोकं येतात तसंच तुम्ही सुद्धा डॉल्फिन पाहण्यासाठी वर्कलाला जाऊन येऊ शकता. महत्वाची बाब म्हणजे यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक पैसे देखील मोजावे लागत नाहीत. इथे समुद्रकिनारे विशेषकरून शांतता आणि आजूबाजूच्या परिसरासाठी ओळखले जातात.
भौक्तिक सौंदर्यासाठी ओळखला जाणारा वर्कला गोव्यातील प्रत्येकाने भेट द्यावा असाच आहे. इथे पोहोचण्यासाठी तुम्ही ट्रेन किंवा विमानाचा मार्ग निवडू शकता, बजेट कमी असेल तरीही काही फारसा फरक पडत नाही कारण ३५०-५०० रुपयांपर्यंत राहायची सोय होऊन जाते गोव्याप्रमाणेच इथे रेंट अ बाईकचा पर्याय उपलब्ध असतो, ज्याचा खर्च ४०० रुपयांपर्यंत जातो.
हे करायचं नसले तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर नक्कीच करू शकता. वर्कला बद्दल आणखीन एक रंजक गोष्ट म्हणजे तिथे असलेलं जटायू अर्थची मूर्ती, ही भलीमोठी मूर्ती कायमच पर्यटकांसाठी आकर्षण बनली आहे, त्यामुळे गोवेकर असाल आणि गोव्यासारख्या आणखीन एका खास जागेच्या शोधात असाल तर वर्कलाला नक्कीच जाऊन येऊ शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.