Sameer Panditrao
हिवाळा हा पर्यटनासाठी बेस्ट सिझन आहे.
भारतात इतकी पर्यटनस्थळे असूनही गोवा का आपल्याला खास वाटतो याची काही कारणे आहेत.
इतरवेळी गरम दमट असणारे गोव्यातले हवामान हिवाळ्यात आल्हाददायक असते.
हिवाळ्यात वॉटर स्पोर्ट्ससाठी उत्तम वातावरण असते. त्यामुळे गोव्याला जास्त पसंती दिली जाते.
डिसेम्बर जानेवारी महिन्यात गोव्यात सण उत्सवांची रेलचेल असते. सेरेंडिपिटी महोत्सव, ख्रिसमस, स्थानिक कार्निव्हल्सचे पर्यटकांना प्रचंड आकर्षण असते.
पावसानंतर मासे आणि इतर सीफूड मार्केटमध्ये उपलब्ध असते. गोवन मसाल्यांच्या सोबत सीफूडचा आस्वाद घेण्यासाठी ही सगळ्यात योग्य वेळ ठरते.
पर्यटकांच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे सजलेले असतात. गोव्यातील ऐतिहासिक चर्च, किल्ले, मंदिरे पाहण्यासाठी हिवाळ्यात जास्त पसंती दिली जाते.