Sewage Problems: सांतिनेज खाडीला संरक्षक भिंती कधी ?

Sewage Problems: सांडपाणी समस्या: नगरसेवकाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
Sewage Problems
Sewage ProblemsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Sewage Problems: थॉमस गॅरेजसमोरील अग्निशामक दलाच्या मैदानाच्या मागील बाजूस असलेल्या सांतिनेज खाडीचे संरक्षक भिंतीचे काम झालेले नाही. इतर ठिकाणी खाडीची संरक्षक भिंत उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे रखडलेले काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्‍न आता प्रभाग क्रमांक आठमधील नागरिक उपस्थित करीत होत आहे.

Sewage Problems
Goa Casino: ‘कॅसिनोवाहू जहाजांना हंगामी परवाने कसे?’

नगरसेवकांनी लक्ष देण्याची मागणीही प्रभागातील नागरिक करीत आहेत. प्रभाग क्रमांक आठच्या बाजूच्या खाडीला लागून असलेल्या घरांतील सांडपाणी व गटारांचे पाणी या खाडीत जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी येथील नागरिकांनी केलेल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सांतिनेज खाडीच्या दोन्ही बाजूने

संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू झाले होते. परंतु अग्निशामक दलाच्या कवायत मैदानाच्या मागील बाजूस असलेल्या सांतिनेज खाडीच्या विरुद्ध बाजूची संरक्षक भिंत उभारणीचे काम राहिले आहे. थॉमस गॅरेज परिसरात खाडीतील घाण पाण्यामुळे आणि रखडलेल्या कामांमुळे या परिसराची रयाच गेलेली दिसते.

Sewage Problems
Goa News: राज्याला स्वच्छ ऊर्जेसाठी जागतिक बॅंकेची मदत

येथील एका व्यावसायिकाने सांगितले की, खाडीच्या बाजूची संरक्षक भिंत उभारण्यासाठी आम्ही नगरसेवकांकडे संपर्कही साधला. परंतु ते काम स्मार्ट सिटी अंतर्गत केले जात असल्याचे समजले. जेव्हा खाडीच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू होत, तेव्हा ते या बाजूनेही केले जाईल, असे वाटत होते. परंतु कशामुळे ते काम थांबविले आहे, हा प्रश्‍न आहे. सांतिनेज खाडी पुनरुज्जीवित करण्याचा विषय यापूर्वी निवडणुकीचा मुद्दा बनत आला होता. परंतु ज्या गतीने संरक्षक भिंतीचे हे काम सुरू झाले तेव्हा खाडीतील पाणी आता नितळ पाहायला मिळणार असे वाटत होते, परंतु खाडीत सांडपाणी किंवा गटाराचे पाणी जाण्याचे मार्ग काही थांबले नसावेत, असे पाण्याची स्थिती पाहिल्यानंतर स्पष्ट जाणवते.

विशेष बाब म्हणजे सांतिनेज खाडीचे पावसाळ्यापूर्वी ताळगाव पंचायत स्वखर्चाने स्वच्छता करीत असते. महानगरपालिकेला या स्वच्छतेचा खर्चही सोसावा लागत नाही. आता खाडीचे रखडलेले काम, नक्की केव्हा पूर्ण होणार हा प्रश्‍न आहे. याबाबत इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी संजित रॉड्रिग्स व या प्रभागाचे नगरसेवक ज्योएल आंद्रादे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कॉल स्वीकारला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Bhandari Community Politics
Vhalshi Lake Protective Wall Damaged
Goa Assembly Election 2027
Goa Monsoon Assembly Session
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com