Goa Crime: 43 कोटींचे कोकेनप्रकरण! गुजरातमधील झिम्बाब्वेच्या नागरिकाला अटक; क्राईम ब्रँच आणखी काहीजणांच्या शोधात

Goa Drugs Case: क्राईम ब्रँचने छापा टाकून जप्त केलेल्या ४३.२० कोटींच्या कोकेनप्रकरणी गुजरात येथे वास्तव्यास असलेल्या तारिरो ब्राईटमोर मंगवाना या झिम्बाब्वेच्या नागरिकाला अटक केली आहे.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: चिकोळणा - बोगमाळो येथे काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने छापा टाकून जप्त केलेल्या ४३.२० कोटींच्या कोकेनप्रकरणी गुजरात येथे वास्तव्यास असलेल्या तारिरो ब्राईटमोर मंगवाना या झिम्बाब्वेच्या नागरिकाला अटक केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची संख्या पाच झाली आहे. आणखी काहीजणांच्या शोधात क्राईम ब्रँच पोलिस आहेत.

या कोकेनप्रकरणामध्ये क्राईम ब्रँचने मुख्य सूत्रधार रेश्‍मा वाडेकर व तिचा पती मंगेश वाडेकर व ड्रग्जची तस्करी करण्यासाठी ग्राहकाकडे पोहचलेला निबू व्हिन्सेट या तिघांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीवेळी रेश्‍मा वाडेकर हिला गुजरातमधील व्यक्तीने २० हजार रुपये तिच्या बँक खात्यावर जमा केले होते.

Goa Drug Case
Goa Drugs Case: 43 कोटींच्या कोकेनसाठी रक्कम आली कुठून? संशयितांना कोठडी वाढीसाठी करणार न्यायालयात उभे

तिला विदेशात पाठवण्यासाठी प्रवास खर्च व व्यवस्था गुजरातच्या चिराज याने केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी चिराज रमेश भाई याला गुजरातमधून अटक केली होती. त्याची चौकशी केली असता त्याने डॉन नामक व्यक्तीच्या निर्देशावरून रेश्‍मा वाडेकर हिला ही रक्कम दिल्याचे कबूल केले होते. तो गुजरातमध्ये राहत असल्याची माहिती दिली होती.

Goa Drug Case
Goa Drug Case: गोवा पोलिसांचा दणका! शिवोलीत 11 कोटींच्या अमली पदार्थासह केरळमधील एकाला अटक

त्याला या डॉनने मोबाईलवरून फोन केला होता त्याचा तपास अत्याधुनिक यंत्रणेच्या मदतीने घेत त्याचा शोध घेण्यात आला. गुजरातच्या संशयित चिराग दुधात व झिम्बाब्वे नागरिक संशयित तारिरो याची न्यायालयीन कोठडीत रवानगी न्यायालयाने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Telangana Police Drug Bust
Patna Triple Talaq Court Judgment
Hyderabad Goa Drug Trafficking Connection
Goa Drug Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com