Goa Crime: पोलीस अधिकारी बनून आले, मासळी वाहनचालकाला लुटले; धर्मापूरात भरदिवसा भामट्यांनी पळवले 4.8 लाख

Fake Police Robbery: उपनिरीक्षक संजय वेळीप पुढील तपास करत आहेत. भारतीय न्याय संहितेचा ३०५ (क) व २०४ कलमाखाली पोलिसानी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.
Police Crime
Fake Police RobberyDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पोलिस अधिकारी असल्याचे भासवून एका मासळीवाहू वाहनाच्या चालकाला दोघा तोतया पोलिसांनी लुबाडण्याची खळबळजनक घटना काल बुधवारी (ता. ७) भरदिवसा शिरली-धर्मापुर येथील राष्ट्रीय हमरस्‍त्‍यावर घडली. त्या भामट्यांनी वाहनचालकाकडे असलेली ४ लाख ८३ हजार रोकड पळवून पोबारा केला. मडगाव पोलिस त्या तोतया पोलिसांचा सध्या शोध घेत आहेत.

या प्रकरणी श्रीधर मोगेर हे तक्रारदार आहेत. ते मूळ कारवार जिल्ह्यातील मुर्डेश्वर येथील आहेत. कर्नाटक राज्य नोंदणीकृत बोलेरो वाहनातून कर्नाटकमधून मासळी मडगावात आणून ती येथील मासळी मार्केटमध्ये देऊन ते परत गावी जात असताना सकाळी पावणेदहाच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघाजणांनी त्यांना रस्‍त्‍यावर अडविले.

त्या तोतयांनी आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगून आपले ओळखपत्रही  दाखविले.  पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय वेळीप पुढील तपास करत आहेत. भारतीय न्याय संहितेचा ३०५ (क) व २०४ कलमाखाली पोलिसानी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.

Police Crime
Goa Crime: मडगाव येथील हॉटेलच्या खोलीत आढळला मुंबईच्या व्यक्तीचा मृतदेह, पोलिस तपास सुरू

भामटे आले होते टाप-टीप!

भामट्यांनी डोक्यावर हेल्मेट घातले नव्हते. ते दोघेही क्लीन शेविंग करून आले होते. वाहनचालकाला त्यांचा सुरवातीला काहीच अंदाज आला नाही. मात्र रोकड पळवून नेल्यानंतर आपण लुबाडलो गेलो हे त्याच्या लक्षात आले. नंतर त्यांनी याबाबत मडगाव पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिस सध्या त्या संशयितांच्या मागावर आहेत. पोलिसांनी आपल्या तपासकामाला सुरवात केली असून, संशयितांचा तपास सुरू आहे.

Police Crime
Goa Crime: मडगाव येथील हॉटेलच्या खोलीत आढळला मुंबईच्या व्यक्तीचा मृतदेह, पोलिस तपास सुरू

‘तू दारू प्‍यायला आहेस’ असे सांगून दामदाटी

पोलिस आहेत असे समजून श्रीधर यांनी आपले वाहन थांबविले. नंतर त्या तोतयांनी वाहनात अमलीपदार्थ आहे अशी दमदाटी करून तपासणीस सुरुवात केली. मागाहून श्रीधर यांना ‘तुझ्या तोंडाला दारूचा वास येत असून तू दारू प्‍यायली आहेस’ असे सांगून त्याचे तोंड पकडले व नंतर वाहनामध्ये असलेले ४ लाख ८३ हजार ६० रुपये घेऊन पळ काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com