गोव्यातील 'ब्रेन ड्रेन'चे मुख्य कारण काय? LOP आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला 10 हजार नोकऱ्यांचा जाब
Unemployment In GoaDainik Gomantak

गोव्यातील 'ब्रेन ड्रेन'चे मुख्य कारण काय? LOP आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला 10 हजार नोकऱ्यांचा जाब

Unemployment In Goa: पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेनुसार गोव्यातील बेरोजगारीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.
Published on

पणजी: जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने जाहीर केलेल्या मोजक्याच नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांच्या रांगा पर्वरी येथे लागलेल्या असून, आमच्या तरुणांचे असे हाल बघवत नाही, अशी खंत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सोमवारी (३० सप्टेंबर) व्यक्त केली.

'प्रत्येक निवडणुकीपूर्वी भाजपने केलेल्या जुमल्यांचा हा परिणाम आहे. जिल्हा परिषद, पंचायत, विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक असो, प्रत्येक निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील युवकांना १० हजार नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते,' असे आलेमाव म्हणाले.

'आम्हाला जाणून घ्यायचं आहे की या नोकऱ्या कुठे आहेत? भाजप गोव्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवत असल्याचा काँग्रेस पक्षाचा आरोप या लांब रांगातून खरा ठरत आहे,' असे आलेमाव म्हणाले.

पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेनुसार गोव्यातील बेरोजगारीचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा दुप्पट आहे, असे आलेमाव यांनी नमूद केले.

गोव्यातील 'ब्रेन ड्रेन'चे मुख्य कारण काय? LOP आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला 10 हजार नोकऱ्यांचा जाब
Comunidade Land: शेतीसाठी दिलेला भूखंड शेतीसाठीच वापरावा लागणार; कोमुनिदादीच्या भूखंडाचे आता रूपांतर अशक्य

एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांनी नोकऱ्यांचे आश्वासन दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की, सर्वांना नोकऱ्या देता येणार नाहीत. सदानंद तानावडे यांना माहित नाही का की, त्यांच्या पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री सावंत यांनी मतदार आणि तरुणांना खोटी आश्वासने दिली आणि त्यांची दिशाभूल केली आहे,‘ असे आलेमाव म्हणाले.

आलेमाव म्हणाले की, गोव्यातील ’ब्रेन ड्रेनचे’ हे मुख्य कारण आहे. 'गोव्यातील तरुणांना नोकरी शोधण्यासाठी परदेशात जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, कारण ज्या नोकऱ्यांची जाहिरात केली जाते, ती जवळच्या व्यक्तींसाठी किंवा 'कॅश फॉर जॉब'साठी बुक केली जाते,' असे ते पुढे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com