Goa Minister Controversy: महत्वाचे दोन मंत्री, दोन मोठे वाद; गोव्यात राणे आणि गावडे वादात का सापडलेत?

Goa Politics: गावडेंवर कारवाईचा इशारा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून देण्यात आला. गावडेच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले.
is minister vishwajit rane and govind gaude will be sacked from goa government
goa health minister vishwajit rane art culture minister govind guade Dainik Gomantak
Published on
Updated on

स्वत:च्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि मुख्यमंत्री सावंत यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता असताना आता आरोग्य आणि वन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी एक वाद ओढावून घेतला आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांना अपमानास्पद वागणूक देत तडकाफडकी निलंबनाचे आदेश दिल्याने मंत्री राणे अडचणीत सापडले आहेत.

प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात कला आणि संस्कृती व क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आदिवासी कल्याण खात्याची जबाबदारी संभाळण्याबाबत त्यांच्या सक्षमतेवर गावडे यांनी भाष्य केले तसेच, भ्रष्टाचारावर देखील गावडेंनी बोट ठेवले.

वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे मंत्री गावडेंच्या या विधानाची गंभीर दखल पक्ष तसेच मुख्यमंत्री सावंत यांनी घेतली. गावडेंवर कारवाईचा इशारा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून देण्यात आला. गावडेच्या मुद्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले.

is minister vishwajit rane and govind gaude will be sacked from goa government
Goa News: मंत्र्यांनी डॉक्टराशी केलेले वर्तन हिंसक; आरोग्यमंत्री राणे यांच्याविरोधात पोलिस तक्रार

अनेक दिवसांपासून रखडलेली मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा गावडेंच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरु झाली. गावडेंना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार याबाबत निश्चित निर्णय दिल्लीत झाल्याचे खात्रीशीर वृत्त देखील समोर आले.

पण, याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री प्रमोद सावंत घेतील, असे दामू नाईक यांनी स्पष्ट केले. दरम्यानच्या काळात दामू नाईक यांची दिल्लीवारी झाली, मुख्यमंत्री सावंत आणि गावडे यांच्यात चर्चा झाली. गावडे आणि दामू नाईक यांच्यात देखील चर्चा झाली. पण, गावडेंचा फैसला अद्याप झालेला नाही.

मंत्री गोविंद गावडेंनी काही दिवसांत युटर्न घेत मुख्यमंत्री यांच्यावर भाष्य न केल्याचा दावा केला. काही आदिवासी नेते आणि संघटना गावडेंच्या समर्थनात रस्त्यावर उतरल्या. दरम्यान, गावडेंनी पक्ष शिस्तभंग केल्याचे सांगत त्यांच्यावर अवश्य कारवाई होईल, असे भाजपकडून सांगितले जात आहे.

is minister vishwajit rane and govind gaude will be sacked from goa government
Goa Media Ban: 'माध्यमांना प्रवेश नाही'! आरोग्य केंद्राच्या फलकावरून पत्रकार वर्गात नाराजी; गोमेकॉ प्रकरणाचा परिणाम?

एका वरिष्ठ पत्रकाराच्या आईला गोमेकॉत इंजेक्शन नाकारल्याचा दावा करत थेट आरोग्यमंत्र्यांना तक्रार करण्यात आली. विश्वजीत राणेंनी याची दखल घेत थेट गोमेकॉ गाठले आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी रुद्रेश कुट्टीकर यांना फैलावर घेतले.

कुट्टीकर यांना कठोर शब्दात जाब विचारत तडक निलंबनाचे आदेश राणे यांच्याकडून देण्यात आले. सामान्य नागरिक आणि रुग्णांशी हेळसांड खपवून घेणार नाही, असे राणे यावेळी म्हणाले. विशेष या सर्व प्रकाराचा व्हिडिओ देखील करण्यात आला व तो सोशल मिडियावर प्रसिद्ध करण्यात आला.

आरोग्यमंत्री राणे यांच्या या वर्तनावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. राणे यांनी कुट्टीकर यांच्या निलंबनाचे दिलेले आदेश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माघारी घेत, त्यांचे निलंबन केले जाणार नाही तसेच, सर्व डॉक्टरांचा आम्हाला आदर असल्याचे स्पष्ट केले.

असे असले तरी या सर्व प्रकाराची गोमेकॉतील डॉक्टर तसेच राज्यातील खासगी डॉक्टरांनी गंभीर दखल घेत राणे यांच्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. राणे यांनी आपत्कालिन विभागात येऊन कुट्टीकरांची माफी मागावी, अशी मागणी डॉक्टरांनी लावून धरली आहे.

is minister vishwajit rane and govind gaude will be sacked from goa government
Suleman Khan: सुलेमान खानची उच्च न्यायालयात धाव! आरोपपत्रांची तपासणी महसूल न्यायालयाकडे देण्याची केली विनंती

मंत्री राणे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कुट्टीकरांची माफी मागितली पण, आपत्कालिन विभागात येऊन त्यांनी माफी मागावी या मागणीवर आंदोलनकर्ते डॉक्टर ठाम आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याप्रकरणात सोमवारी रात्री मध्यस्थी करत यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राणे यांनी माफी मागावी या मागणीवर ठाम असणारे डॉक्टर मुख्यमंत्री सावंत यांच्या आवाहनानंतर आंदोलन मागे घेणार का? तसेच, आरोग्यमंत्री राणे माफी मागणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com