
पणजी : गोमेकॉच्या आपत्कालीन विभागातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारताना त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याविरोधात ॲड. सिओला वाझ यांनी पणजी पोलिसांत लेखी तक्रार दिली आहे. मात्र, हे प्रकरण बांबोळी येथील असल्याने अधिकारक्षेत्रानुसार ते पुढील चौकशीसाठी आगशी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
आरोग्यमंत्री राणे यांनी आपत्कालीन विभागात ड्युटीवर असलेल्या डॉ. कुट्टीकर यांच्यावर केलेला शाब्दिक हल्ला व दिलेली वागणूक अशोभनीय आहे. ही बाब हिंसक प्रतिबंधक कायद्याखाली येते. मंत्र्यांनी डॉक्टराशी केलेले वर्तन व शाब्दिक हल्ला हा हिंसक प्रकारचाच भाग आहे. तसेच त्या डॉक्टराचे अधःपतन व मानहानी करण्यासारखे आहे.
राणे हे आरोग्यमंत्री असले तरी ज्या प्रकारे त्यांनी आपत्कालीन विभागात प्रवेश करून दहशत निर्माण केली व तेथील डॉक्टरला वागणूक दिली, ती चुकीची होती. त्यांनी येताना सोबत कॅमेरामनला आणले होते.
इस्पितळात व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. तसेच रुग्णांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश करता येत नाही. मात्र राणे यांनी अनेकदा नियमांचे उल्लंघन केले आहे, असे ॲड. सिओला यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विश्वजीत राणे यांच्या विरोधात गोमेकॉतील डॉक्टर आक्रमक झाले आहेत. राणे यांनी आपत्कालिन विभागात येऊन कुट्टीकर यांची माफी मागावी अशी, मागणी केली जात आहे.
राणे यांनी माफी न मागितल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. दुसरी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत नरमाईची भूमिका घेत डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.