Suleman Khan: सुलेमान खानची उच्च न्यायालयात धाव! आरोपपत्रांची तपासणी महसूल न्यायालयाकडे देण्याची केली विनंती

Suleman Khan Case: जमीन हडपप्रकरणी म्हापसा पोलिसात नोंद झालेल्या तक्रारीचा तपास एसआयटीने करून संशयित सुलेमान खान याच्याविरुद्ध आरोपपत्रे दाखल केली आहेत.
Suleman Khan Case Updates
Suleman KhanDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जमीन हडपप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून कोठडीत असलेल्या संशयित सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे.

त्याच्याविरुद्ध म्हापसा व वाळपईत दाखल केलेल्या गुन्ह्यांसह आरोपपत्रांची तपासणी महसूल न्यायालयाकडे द्यावी व नव्याने तक्रार दाखल करायची असल्यास ती केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) देण्याची विनंती केली आहे.

एसआयटीने म्हापसा व वाळपई पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारी तसेच आरोपपत्रे रद्द करण्यात यावीत. या तक्रारी रद्द करून ही प्रकरणे महसूल न्यायालयाकडे द्यावीत व त्यामध्ये नवी तक्रार दाखल करून तपास करायचा झाल्यास ती सीबीआयसारख्या स्वतंत्र तपास यंत्रणेकडे द्यावीत अशी विनंती सुलेमान याने केली आहे.

Suleman Khan Case Updates
Suleman Khan Case: सुलेमान सिद्दिकीची याचिका हायकोर्टाने फेटाळली; प्रकरण CBI कडे सोपवण्यास नकार

याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत प्रथमश्रेणी आरोपपत्रांवरील सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती केली आहे. आज सुनावणीवेळी त्याच्या वकिलांनी वकालत दाखल करण्यासाठी वेळ मागितल्याने ही सुनावणी १० जुलैपर्यंत तहकूब केली. जमीन हडपप्रकरणी म्हापसा पोलिसात नोंद झालेल्या तक्रारीचा तपास एसआयटीने करून संशयित सुलेमान खान याच्याविरुद्ध आरोपपत्रे दाखल केली आहेत.

Suleman Khan Case Updates
Suleman Khan: आईच्या धार्मिक विधीसाठी केलेला सुटकेचा अर्ज सुलेमान खानकडून मागे; ठोस कारण देण्यात ठरला असमर्थ

पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे व आरोपपत्रात उल्लेख केलेली माहिती आमदार जोसुआ डिसोझा याच्या दडपणामुळे पोलिसांनी केली आहे. पोलिसांनीच मला हुबळीला पंचानामा करण्याच्या नावाखाली नेले व पलायन केल्याचा खोटा दावा केला. जमीन हडपप्रकरणीचा खोटा दावा पोलिसांनी केला आहे. या मालमत्तेचा दस्तावेज बार्देश मामलेदार कार्यालयातच आहे त्याची तपासणी महसूल न्यायालयामार्फत करण्यास सांगून त्यामध्ये नव्याने तक्रार दाखल करण्याची आवश्‍यकता भासल्यास त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी विनंती त्याने केली आहे. गेल्या डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यापासून तो अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com