Kolkata Doctor Case: ''आम्ही डॉक्टर इतरांचे जीव वाचवतो पण, आज...''; कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ गोव्यात डॉक्टरांचा मूक मोर्चा

Kolkata Doctor Case: कोलकाता येथील डॉक्‍टरवर लैंगिक अत्‍याचार करुन तिचा खून केल्‍याप्रकरणी कठोर कारवाईसाठी डॉक्‍टरांनी एकजूट दाखवत निद्रिस्‍त प्रशासनाचा निषेध नोंदवला.
Kolkata Doctor Case: ''आम्ही डॉक्टर इतरांचे जीव वाचवतो पण, आज...''; कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ गोव्यात डॉक्टरांचा मूक मोर्चा
Kolkata Doctor CaseDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोलकाता येथील डॉक्‍टरवर लैंगिक अत्‍याचार करुन तिचा खून केल्‍याप्रकरणी कठोर कारवाईसाठी डॉक्‍टरांनी एकजूट दाखवत निद्रिस्‍त प्रशासनाचा निषेध नोंदवला. गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील यांच्या म्हणण्यानुसार, सुपरस्पेशालिटीमधील बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी होती. मेडिसीन विभागात 190 रुग्ण आले होते. एरव्ही विविध प्रकारच्या बाह्यरुग्ण विभागांत प्रत्येकी दोनशेहून जास्त रुग्ण असतात. आज ती संख्या 70 पर्यंत रोडावली होती. रुग्‍णांची तपासणी करुन त्यांना वैद्यकीय सेवा पुरवण्‍यात आली.

दरम्यान, राज्यातील विविध संघटना एकवटल्‍या. ज्यामध्‍ये खासगी डॉक्टर संघटना, आयुर्वेदिक डॉक्टर संघटना, परिचारिका संघटना, फार्मसी संघटना व इतर संघटनांनी एकत्र येत पणजीतील आझाद मैदान ते गोवा वैद्यकीय महाविद्यालयाची जुनी इमारत असा मूक मोर्चा काढला. तर, गोवा निवासी डॉक्टर संघटनेने पोटो-पणजी ते इमॅक्युलेट चर्चपर्यंत मोर्चा काढत न्यायाची मागणी केली. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयानेही या घटनेचा निषेध केला.

Kolkata Doctor Case: ''आम्ही डॉक्टर इतरांचे जीव वाचवतो पण, आज...''; कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ गोव्यात डॉक्टरांचा मूक मोर्चा
Kolkata Doctor Case: काळ्या फिती बांधून रुग्णांची तपासणी! मडगावात डॉक्‍टरांचा मूक आक्रोश

आझाद मैदानावरुन मूक मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी गोवा इंडियन मेडिकल असोसिएशन शाखेचे अध्यक्ष डॉ. संदेश चोडणकर म्हणाले की, आम्ही डॉक्टर इतरांचे जीव वाचवतो, परंतु आज आमच्याच जीवावर बेतत आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडता कामा नयेत यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा आणणे गरजेचे आहे. गोव्यात वैद्यकीय कायदा अस्तित्वात आहे, पण त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नाही. राज्य सरकारने या कायद्यात दुरुस्ती करण्यासह डॉक्टर, परिचारिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणे काळाची गरज आहे.

Kolkata Doctor Case: ''आम्ही डॉक्टर इतरांचे जीव वाचवतो पण, आज...''; कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ गोव्यात डॉक्टरांचा मूक मोर्चा
Kolkata Doctor Case: कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ पणजीत डॉक्टर, परिचारिकांचा 'एल्गार'! गोवा वैद्यकीय कायद्यात दुरुस्तीची मागणी

आमच्या मुली, बहिणी सुरक्षित नसतील तर त्याचा काय उपयोग?

डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले की, सरकार डॉक्टरांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहत नाही. कारण आम्ही एकत्र नसतो. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत असे वाटत असेल तर आम्ही एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे. कामाच्या ठिकाणी आमच्या मुली, बहिणी सुरक्षित नसतील तर त्याचा काय उपयोग? आम्ही डॉक्टर संवेदनशील असतो. अन्याय होऊनही आम्ही आपत्कालीन सेवा सुरू ठेवलेली आहे. डॉक्टरांवर हल्ला झाल्‍यास किंवा त्‍यांच्‍याबाबत इतर काही घटना घडल्यास तात्काळ एफआयआर नोंदवून योग्य कारवाई होणे गरजेचे आहे. आम्ही जोपर्यंत सरकारवर दबाव आणत नाही, तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही.

‘आयएमए’चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

राज्यातील डॉक्टर, परिचारिक‍ांना सुरक्षा देण्यासाठी गोवा वैद्यकीय कायद्यात दुरुस्ती, जिल्हा कृती दलांची तत्काळ स्थापना करण्यासह इस्पितळांना सुरक्षित ठिकाणे म्हणून जाहीर करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन देऊन केली. यावेळी मुख्यमंत्री म्‍हणाले, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री स्वतः महिला असूनही या प्रकारच्या घटनेत त्‍यांनी हलगर्जीपणा केला. हे निषेधार्ह आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com