कोलकाता येथील एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून झाला. अशा घटना अन्यत्र घडू नयेत म्हणून देशभरातील डॉक्टरांनी आज आंदोलन केले. गोव्यातूनही निषेध नोंदवण्यात आला.
पश्र्चिम बंगालमध्ये एका हॉस्पिटलमधील युवा महिला डॉक्टरवर सामूहिक बलत्कारानंतर झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आज इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांचा देशव्यापी संप पुकारला. त्यात गोव्यातील डॉक्टरही सहभागी झाले व त्यांनी ऐक्य दाखवले.
मडगावातील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनीसुद्धा असोसिएशनच्या संपाला आपला पाठिंबा दर्शविला. मात्र, त्यांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून, हाताला काळ्या फिती बांधून रुग्णांची तपासणी चालू ठेवली. हॉस्पिटलात ओपीडीसुद्धा चालू होती व रुग्णवाहिकाही उपलब्ध असल्याने रुग्णांचे किंवा सामान्य नागरिकांचे हाल झाले नाहीत.
आज दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सकाळी सर्व डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी एकत्र आले. त्यांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून नंतर कामाला सुरवात केली. या प्रसंगी डॉ. एडी डिमेलो यांनी सांगितले, की आम्ही बलत्कार करून हत्या केलेल्या युवा महिला डॉक्टरला श्रद्धांजली वाहतो. तिच्या कुटुंबियांप्रती आम्हाला सहानभुती आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.