Lavoo Mamledar Death: लवू मामलेदार यांचा मृत्यू कशामुळे झाला? खरं कारण येणार समोर; व्हिसेरा बंगळूरूला पाठवला

Goa Ex-MLA Lavoo Mamledar Death Case:मामलेदार यांच्या कारने किंचत कॅबला स्पर्श केल्याने संतापलेल्या सनदीने मामलेदार यांना धक्काबुक्की केली.
Goa Ex-MLA Lavoo Mamledar Death Case
Lavoo MamledarDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा बेळगावमध्ये कॅब वजा रिक्षा चालकाशी वाद झाल्यानंतर मृत्यू झाला. रिक्षाला कारचा थोडासा धक्का लागल्याने संतापलेल्या रिक्षा चालकाने मामलेदार यांना धक्काबुक्की केली. यानंतर लॉजच्या रिसेप्शनजवळ असताना मामलेदार कोसळले आणि त्यांचे निधन झाले. दरम्यान, मामलेदार यांच्या मृत्यूचे खरे कारण आता समोर येणार असून, त्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी बंगळूरूला पाठवण्यात आला आहे.

बेळगावातील खडेबाझार परिसरात दुपारी दीडच्या सुमारास मामलेदार आणि रिक्षा तथा कॅब चालक अमीरसोहेल उर्फ मुजाहीद शकीलसाब सनदी (२७) याच्यात वाद झाला. मामलेदार यांच्या कारने किंचत कॅबला स्पर्श केल्याने संतापलेल्या सनदीने मामलेदार यांना धक्काबुक्की केली. यानंतर मामलेदार लॉजमध्ये जात असताना रिसेप्शनजवळ कोसळले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

Goa Ex-MLA Lavoo Mamledar Death Case
Goa Ex- MLA Death: खून का हृदयविकाराचा झटका? गोव्याच्या माजी आमदाराचा बेळगावात मृत्यू

याप्रकरणी मार्केट पोलिसांनी कॅब चालक अमीरसोहेल उर्फ मुजाहीद शकीलसाब सनदी (२७) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करुन अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सनदी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), १२६(२), १५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मामलेदार यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. हा व्हिसेरा तपासणीसाठी बंगळूरूला पाठवण्यात येणार आहे. या तपासणीनंतर मामलेदार यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

Goa Ex-MLA Lavoo Mamledar Death Case
Goa Opinion: क्रोध म्हणजे हातावर घेतलेला निखारा! लवू मामलेदार मृत्यू आणि ‘रोडरेज’वरुन काय धडा घ्यावा?

लवू मामलेदार महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या तिकिटावर २०१२ साली फोंडा मतदार संघातून निवडून आले होते. २०१७ साली त्यांचा काँग्रेसच्या रवी नाईक यांच्याकडून पराभव झाला. काही काळासाठी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण, २०२२ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com