Weather Forecast : विविध राज्यांमध्ये आज पाऊस लावणार हजेरी; गोव्यातही मध्यम सरी कोसळणार

India Weather Forecast : मागील काही दिवसांपासून देशभरात अनेक ठिकाणी पावसाने आपली हजेरी लावली आहे.
India Weather Forecast :
India Weather Forecast :Dainik Gomantak
Published on
Updated on

India Weather Forecast : मागील काही दिवसांपासून देशभरात अनेक ठिकाणी पावसाने आपली हजेरी लावली आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. दुसरीकडे, हवामानाचा विचार केल्यास, हरियाणा आणि लगतच्या भागावर चक्री वारे वाहत आहेत. त्यामुळे राजस्थानसह देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. झारखंडच्या काही, भागातही वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येतो. चला जाणून घेऊया आजचे हवामान कसे असेल.

(India Weather Forecast )

India Weather Forecast :
Microplastics in Milk : धक्कादायक! आईच्या दुधात मिळाले मायक्रोप्लॅस्टिक; जाणून घ्या नवजात बाळाच्या आईने काय करावे

उत्तर प्रदेशातील राजधानी लखनऊसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर 12वीपर्यंतच्या सर्व सरकारी आणि निमसरकारी शाळा आणि उच्च शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झारखंडच्या काही भागात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव दिसून येत आहे. दिल्लीत पावसामुळे तापमानाचा पारा घसरला आहे.

या राज्यांमध्ये पावसाची शक्यता

आज म्हणजेच बुधवारी देशाच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. हवामानानुसार, पुढील 24 तासांत अरुणाचल प्रदेशात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. याशिवाय सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

8th Pay Commission Latest Update
Girl Dancing In Moving Local Train
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Young biker losing control while performing a dangerous stunt on a public road
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com