हवामानाचा लहरीपणा, आंबा-काजू पीक संकटात? बागायतदारांची धाकधूक वाढली

weather impact on crops: गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या आंबा आणि काजू पिकावर यंदा पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत.
goa weather fluctuations
goa weather fluctuationsDaink Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेल्या आंबा आणि काजू पिकावर यंदा पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढवण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडी कमी होऊन उष्णता आणि दमट हवामान अचानक वाढल्याने बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मानांकन मिळालेल्या पिकांवर टांगती तलवार

सध्या आंबा आणि काजूची झाडे चांगल्या प्रकारे मोहोरली असली, तरी या हवामानामुळे मोहोराची गळती किंवा कीड लागण्याची भीती व्यक्त होत आहे. गोव्यातील अनेक पिकांना जागतिक स्तरावर भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळाले आहे. यामध्ये:

  • आंबा: माणकूर, हिलारिओ आणि मुसराद.

  • काजू: गोवा काजू, काजू फेणी आणि काजू बोंडू.

हे सर्व प्रकार गोव्याची ओळख आहेत. जर हवामान असेच दमट राहिले, तर या 'प्रीमियम' दर्जाच्या फळांच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते. विशेषतः काजू पीक चांगले आले, तरच काजू फेणीच्या उत्पादनात वाढ होते, ज्यावर अनेक स्थानिक उद्योजक अवलंबून आहेत.

goa weather fluctuations
Crop Damage Goa: 80 ते 90 टक्के सुपारी गेली गळून! मुसळधार पावसामुळे बागायतदार हतबल; कष्ट, औषधे, मजुरी सगळंच वाया

पाच वर्षांचा अनुभव आणि घटते उत्पादन

गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, बदलत्या हवामानामुळे सातत्याने उत्पादनात घट होत आहे. कधी अवकाळी पाऊस तर कधी अचानक वाढलेली आर्द्रता यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यावर्षी सुरुवातीला पीक चांगले येईल अशी आशा होती, मात्र आता निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुन्हा हतबल झाले आहेत.

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

उत्पादनात मोठी घट होऊ नये यासाठी कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामानातील बदलामुळे पिकावर पडणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य औषध फवारणी आणि खतांचे नियोजन करणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com