Digambar Kamat - Pramod Sawant
Digambar Kamat - Pramod Sawant Dainik Gomantak

MLA Digambar Kamat: हाज यात्रेसाठी गोव्यातून थेट विमानसेवा सुरू करू; आमदार दिगंबर कामत

MLA Digambar Kamat: हाज यात्रेसाठी गोव्यातून थेट विमानसेवा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करू, आमदार दिगंबर कामत
Published on

MLA Digambar Kamat: आपण मुख्यमंत्री असताना हाज यात्रेकरूंसाठी गोव्यातून थेट विमानसेवेची व्यवस्था केली होती. ही सेवा परत सुरू करण्यासाठी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करू, असे आमदार दिगंबर कामत यांनी आज गोवा राज्य हाज समिती कचेरीच्या उद्‍घाटनप्रसंगी सांगितले.

Digambar Kamat - Pramod Sawant
Goa Road Issue: रेल्वे प्रशासनाविरुद्ध पुन्हा वेळसांववासीयांची निदर्शने

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या कचेरीचे उद्‍घाटन करण्यात आले. गोवा राज्य हाज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माथानी साल्ढाना प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर ही कचेरी उघडण्यात आली आहे. त्यानंतर राज्यसभा खासदार व गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भेट देऊन मुल्ला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

गोव्यातील सर्व अल्पसंख्यांना सर्वतोपरी सहकार्य सरकारतर्फे देण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. दरम्यान, अध्यक्ष उर्फान मुल्ला यांनी गोव्यातील मुस्लिम बांधव सरकारसोबत आहेत. सरकार समाजापर्यंत पोहोचवीत आहे याची जाणीव सर्वांना असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com