Goa Water Shortage: आणखी 15 दिवस पाऊस न पडल्‍यास 'पाण्या'वर मर्यादा! पाणी जपून वापरण्याचं सुभाष फळदेसाईंचं आवाहन

Water supply restrictions Goa: राज्‍यात आणखी १५ दिवस पाऊस न पडल्यास पाण्‍याच्‍या वापरावर मर्यादा घालण्‍यात येणार आहेत.
Water supply restrictions Goa
Goa Water ShortageDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यात आणखी १५ दिवस पाऊस न पडल्यास पाण्‍याच्‍या वापरावर मर्यादा घालण्‍यात येणार आहेत. त्‍यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्‍वे लवकरच पिण्‍याचे पाणी खात्‍यामार्फत जारी करण्‍यात येतील, अशी माहिती मंत्री सुभाष फळदेसाई यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

खात्‍याने योग्य व्यवस्थापन केल्‍यामुळे अजूनपर्यंत पाण्याची कमतरता जाणवलेली नाही. सर्वच भागांमध्‍ये पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा सुरू आहे. परंतु पुढील १५ दिवस पाऊस न पडल्‍यास मात्र पाणीटंचाई जाणवू शकते.

Water supply restrictions Goa
Goa Pre-Monsoon Rain: वरुणराजा रुसला! पावसाची सरासरी घटली, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण; उत्तर गोव्याची बिकट अवस्था

त्‍यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून आधीच पाण्याचा (Water) वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतील’, असे मंत्री फळदेसाई म्‍हणाले. ‘सध्‍याची स्‍थिती लक्षात घेऊन नागरिकांनी पिण्‍याच्‍या पाण्‍याचा गैरवापर करता कामा नये. इतर कामांसाठी लागणाऱ्या पाण्‍यासाठी पर्यायांचा वापर करावा’, असे आवाहनही त्‍यांनी केले.

Water supply restrictions Goa
Goa Unseasonal Rain: पावसामुळे गोमंतकीयांना किंचित दिलासा, राज्‍याच्‍या काही भागांत बरसला; तरीही उकाडा

‘एअरटेल’कडून दंड वसूल करणार!

तोरसे-पेडणे येथील पाईपलाईन फुटण्‍यास ‘एअरटेल’ कंपनीच जबाबदार असल्‍याचे सिद्ध झालेले आहे. त्‍यामुळे ‘एअरटेल’ कंपनीला नोटीस जारी करण्‍याचे निर्देश आपण खात्‍याच्‍या अधिकाऱ्यांना दिले आहेत. या कंपनीविरोधात ‘एफआयआर’ दाखल करून दंड वसूल केला जाईल, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com