CM Pramod Sawant : जलक्रीडा प्रकार ‘जैसे थे’ स्थितीत

मुख्यमंत्र्यांकडून तोडगा : येणाऱ्या मोसमात अंतिम निर्णय घेणार
CM Pramod Sawant Inspection at NIWS
CM Pramod Sawant Inspection at NIWS Dainik Gomantak
Published on
Updated on

समुद्र किनाऱ्यावर चालणाऱ्या जलक्रीडा प्रकारात जेल या यंत्रणेच्या हस्तक्षेपाला विरोध करणाऱ्या स्थानिक ऑपरेटर्सना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तात्पुरता दिलासा देताना हा मोसम संपेपर्यंत आहे त्या स्थितीतच हा व्यवसाय चालू ठेवण्याची मुभा दिली.

यंदाचा पर्यटन मोसम संपण्यास फक्त दोन महिने बाकी आहेत. तोपर्यंत स्थानिक ऑपरेटर्स सध्या चालू आहे त्याच पद्धतीने हा व्यवसाय चालू ठेवणार असून या दोन महिन्यांत त्यांनी ‘क्यू सिस्टम’ पद्धतशीरपणे पाळावी असे त्यांना सांगण्यात आले.

CM Pramod Sawant Inspection at NIWS
Babush Monserrate: पणजीतील पेव्हिंग ब्लॉकच्या कामांवर महसूल मंत्री नाराज; PWD मंत्र्यांकडे तक्रार

या दोन महिन्यांत हा व्यवसाय कसा चालतो हे पाहून पुढच्या मोसमात हा व्यवसाय नियंत्रित करण्यासाठीं वेगळी यंत्रणा राबवावी की स्थानिक ऑपरेटर्सकडूनच तो चालवावा याचा निर्णय पर्यटन खाते घेणार आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पणजी येथे झालेल्या या बैठकीला पर्यटनमंत्री रोहन खवंटे, आमदार मायकल लोबो, व्हेंझी व्हिएगस, केदार नाईक आणि जलक्रीडा ऑपरेटर्स उपस्थित होते.

‘मुख्यमंत्र्यांचे आभार’

आम्ही ही क्यू पद्धती चांगल्या प्रकारे राबवू शकतो हे येत्या दोन महिन्यांत सरकारला दाखवून देऊ. सरकारने आमच्यावर विश्वास दाखविल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री सावंत, पर्यटनमंत्री खवंटे आणि आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व आमदारांचे आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया जलक्रीडा चालकांचे प्रतिनिधी पेले फर्नांडिस यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Dhangar Community ST Status
Goa Police Recruitment
Pramod Sawant Convoy Accident
home minister amit shah reviews goa st reservation file
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com