Babush Monserrate: स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत गोवा साधनसुविधा विकास महामंडळामार्फत मिरामार समुद्रकिनाऱ्यावरील सौंदर्यीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे व लवकरच त्याचा ताबा पणजी महापालिकेकडे देखभालीसाठी सुपूर्द करण्यात येणार आहे.
तो घेण्यापूर्वी सर्व काम झाले आहे का, याची पाहणी पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केली. या वेळी पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
यावेळी कांपाल येथील बालभवन जंक्शन येथे टाकलेल्या पेव्हर ब्लॉक्सवरही मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांच्याकडे तक्रार केली आहे.
मंत्री मोन्सेरात म्हणाले की, “बालभवन येथे सुरू असलेल्या फुटपाथचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. पूर्वीचा दर्जा चांगला होता. पावसाळ्यात चिखल फुटपाथ, रस्त्यावर येईल. चिखल नाल्यामध्ये साचून राहिल, असे मंत्री म्हणाले.
या कामाच्या पाहणीवेळी समुद्रकिनारी भागात एक सुलभ शौचालय आहे. त्यामुळे या समुद्रकिनारी फेटफटका मारणाऱ्या पर्यटकांना या शौचालयासाठी पुन्हा मागे यावे लागते. हे अंतर खूपच आहे. त्यामुळे आणखी एक शौचालय दुसऱ्या टोकाला उभारण्याची सूचना करण्यात आली.
काही ठिकाणी पाण्याची सोय केली आहे त्या ठिकाणचे नळच चोरीला गेल्याचे आढळून आले आहेत. हे काम करताना स्मार्ट सिटीने त्या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात न केल्याने हे प्रकार घडले आहेत. या कामाची देखभाल पणजी महापालिकेने हाती घेतल्यावर त्या ठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणूक केली जाईल.
या कामाचा आढावा घेताना त्यांच्यासोबर महापौर रोहित मोन्सेरात, उपमहापौर संजीव नाईक, साधनसुविधा विकास महामंडळाचे तसेच पीडब्ल्यूडीचे अधिकारी उपस्थित होते.
अस्वच्छतेचीही घेतली दखल
या मिरामार समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असले तरी काही ठिकाणी अस्वच्छता मंत्री मोन्सेरात यांना दिसून आली ती स्वच्छ करण्याच्या सूचना त्यांनी लगेचच अधिकाऱ्यांना दिल्या. या ठिकाणी दुचाकी पार्किंगचीही सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना वाहने रस्त्यावर ठेवण्याची वेळ येऊ नये.
मिरामार समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यीकरणामुळे येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी व स्थानिकांना अडचणी भासणार नाहीत याचा विचार करण्यात आला आहे. मिरामार सर्कल ते विज्ञान केंद्रापर्यंत या समुद्रकिनाऱ्याकडून दोना पावलाकडे जाणाऱ्या रस्त्याचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.