म्हापशात दुचाकींची चोरी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. यात एका अल्पवयीन आरोपीसह अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपींकडून चोरीच्या चार दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या असून अल्पवयीन आरोपीची रवानगी अपनाघरात करण्यात आली आहे.
हा संपूर्ण प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा रेवोडा येथील रहिवासी असलेल्या दत्ताराम मांद्रेकर यांनी आपली यामाहा कंपनीची फसिनो दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात दिली. काल 8 जानेवारी रोजी अज्ञाताविरोधात दुचाकी चोरीची तक्रार नोंदवण्यात आली होती. GA-03-AE-4811 या क्रमांकाच्या दुचाकीची अंदाजे रक्कम 50 हजार रुपये असल्याचंही तक्रारीत नोंद करण्यात आलं होतं. यानंतर तपासाची सुत्र वेगाने फिरवत म्हापसा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
म्हापसा पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी आरोन स्टिव्हन मोंतेरो या शिवोलीतील आरोपीसह अन्य एका 17 वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं. अल्पवयीन आरोपीची रवानगी अपनाघरमध्ये करण्यात आली आहे. तर आरोपींकडून चार दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या दुचाकी
1. YAMAHA FASCINO GA-03 AE-4811
2. Hero Passion MH-07 U-8291
3. Hero Splendar GA-03 D-7045
4. Honda Activa GA-03 AN-4935
जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची अंदाजे किंमत 3 लाख रुपये आहे. मुख्य आरोपीला 3 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.