खाणीतील पाणी ओलांडतेय धोक्याची पातळी, गावांना धोका

खाणी बंद असल्याने उपसा न झाल्याचा परिणाम, पावसाळ्यात पातळी वाढण्याची शक्यता
Water in Mining Dumps
Water in Mining Dumps Dainik Gomantak

पिसुर्ले : पिसुर्ले होंडा परिसरातील खाण व्यवसाय गेल्या 10 वर्षांपासून पूर्णपणे बंद असल्याने येथील खाणींच्या खंदकात साठलेल्या पाण्याचा उपसा झाला नाही. परिणामी सदर खाण पिटातील पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून पावसाळा सुरु होण्यापूर्वीच काही ठिकाणी पाणी झिरपत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याची पातळी आणखीन वाढून खालच्या भागात असलेल्या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Water in Mining Dumps
वीज वाहिनीच्या दुरुस्तीवेळी झटका बसून कर्मचाऱ्याचा मृत्यू

पर्ये मतदार संघात येणाऱ्या होंडा तसेच पिसुर्ले पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खाण व्यवसाय गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु होता. यामध्ये सेसा गोवा, दामोदर मगंलजी, आर एस शेट्ये, चौगुले, फोमेन्तो अशा नामवंत खाण कंपन्याचा समावेश होता. गेल्या दहा वर्षांपासून विविध कारणांमुळे या भागातील खाण व्यवसाय बंद असल्याने या खाण कंपन्यांच्या पिटामध्ये पाणी साठलं आहे. सध्या या भागातील पिसुर्ले तसेच वाघुरे शिंगणे या ठिकाणी बंद असलेल्या खाणी मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले आहे. त्यातील पिसुर्ले तसेच धाटवाडा गावाजवळ असलेल्या खाण पिटातील पाणी वर येऊन जवळपास असलेल्या शेतात झिरपू लागले आहे.

Water in Mining Dumps
गोव्यात पिंक पोलिस फोर्स महिलांसाठी असुरक्षित?

यापूर्वी खाणी सुरु असताना सदर खाणीतील पाण्याचा दिवस रात्र यंत्राद्वारे उपसा होत होता. त्यामुळे पाण्याची पातळी समतोल राहण्यासाठी मदत होत होती. त्याचप्रमाणे हे पाणी जवळपास असलेल्या नाल्यात सोडले जात असल्याने परिसरातील शेती बागायतीना याचा फायदा होत होता. परंतु सध्या खाण व्यवसाय बंद असल्याने खाणीतील पाण्याचा उपसा झाला नाही. त्यामुळे पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असून सरकारने तातडीने योग्य ती पावले उचलण्याची मागणी होत आहे. या खाणीतील पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर झिरपत असल्याने तेथे दलदल निर्माण झाली आहे.

या खाणीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून संबंधित खाण कंपन्या तसेच सरकारला कळवण्यात आले आहे. सदर पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने पावसाळ्यात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना धोका आहे. त्यामुळे तातडीने याप्रकरणी सरकारने लक्ष घालण्याची गरज स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com