Goa Pink Force
Goa Pink Force Dainik Gomantak

गोव्यात पिंक पोलिस फोर्स महिलांसाठी असुरक्षित?

पिंक पोलिसांमधील अधिकाऱ्याकडून हल्ल्याचा ताळगावातील महिलेचा आरोप
Published on

पणजी : गोव्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष अशी पिंक फोर्स तयार करण्यात आली आहे. मात्र नुकत्याच ताळगावातील एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर आता पिंक पोलिस फोर्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 1 मे रोजी हल्लेखोरांच्या टोळक्यासोबत महिलेला मारहाण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे.

Goa Pink Force
'येत्या 6 महिन्यांत वाघेरी वन्यजीव संवेदनशील परिसर बनवणार'

मारहाणीप्रकरणी पिंक पोलिस महिला कर्मचाऱ्याविरोधात गोव्याचे पोलीस महासंचालक जसपाल सिंग आणि केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार महिलेने शेजाऱ्यांना त्यांच्या घरातील सांडपाणी न सोडण्याची विनंती केली होती. मात्र यामुळे चिडलेल्या शेजाऱ्यांनी महिलेला मारहाण केली, ज्यात महिलेच्या डोक्यासह शरिराला गंभीर इजा झाली.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ईश्वर कुट्टीकर नावाच्या व्यक्तीने आपले केस पकडून आपल्याला धक्काबुक्की केली आणि मारहाण केली. तर नानिल कुट्टीकर याने खांद्याला पकडलं. तृप्ती कुट्टीकर नावाच्या महिलेने केस ओढत कानाखाली लगावल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. तर देवू कुट्टीकर नावाच्या व्यक्तीने आपल्याला नाजूक जागी मारहाण केल्याची तक्रार महिलेने दिली आहे.

Goa Pink Force
दोडामार्गातील फुकेरी धरणाचे काम महाराष्ट्राकडून सुरूच...

याप्रकरणी तक्रारदार महिलेने पोलीस महासंचालकांसह मानवाधिकार आयोगाचं दार ठोठावलं असून तीन पानी तक्रारही सादर केली आहे. मारहाणीनंतर अर्धवट बेशुद्धावस्थेत असताना आपण पिंक पोलीस फोर्सला याची माहिती देत बोलावलं. मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या पिंक पोलीस अधिकारी महिलेने मदत करण्याऐवजी तिला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com