Goa Electricity
Goa ElectricityDainik Gomantak

वीज वाहिनीच्या दुरुस्तीवेळी झटका बसून कर्मचाऱ्याचा मृत्यू

वीज खात्याच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप; अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारला
Published on

वाळपई : वीज वाहिनीचे दुरुस्तीच्या कामावेळी कणकिरे येथे दुर्घटना घडली आहे. वीज वाहिनी दुरुस्त करताना वीजेचा झटका लागून वाळपई येथील वीज खात्याच्या लाईनमनचा मृत्यू झाला आहे. संजय गांवकर ( रा. ठाणे -सत्तरी) असं या मृत कर्मचाऱ्याचं नाव असून विजेचा झटका लागून जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे.

सत्तरी तालुक्यात कणकिरे येथे आज बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास वीजेच्या तारांचा झटका लागून वाळपई वीज कार्यालयाचे लाईनमन संजय राजगो गांवकर यांचा मृत्यू झाला. सध्या पावसाळी वातावरण असून काल मंगळवारी सायंकाळी पावसाने सत्तरीला झोडपले होते. आज बुधवारी सकाळी कणकिरे गावात वीज तारांचे काम करीत असताना झाडांच्या फांद्या छाटत असताना संजय गावकर यांना वीजेचा जोरदार झटका लागून त्यांनी जीव गमावावा लागला आहे. ही बातमी पसरताच वाळपई आरोग्य केंद्रात नागरिकांनी गर्दी केली होती.

Goa Electricity
गोव्यात पिंक पोलिस फोर्स महिलांसाठी असुरक्षित?

दरम्यान याप्रकरणी गावकर कुटुंबीयांना योग्य त्या सरकारी मदतीचे आश्वासन मिळत नाही तोवर मृतदेह घेतला जाणार नाही, अशी भूमिका घेण्यात आली होती. यावेळी वीज खात्याचे वरिष्ठ अधिकारी अभियंता आदींनी कुटुंबीयांना आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या घटनेने ठाणे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संजय यांना पत्नी, आई आणि दोन वर्षाची मुलगी असा परिवार आहे.

दरम्यान त्यांचा मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळीत गोमेकॉत पाठवण्यात आला असून वाळपई पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com