CM Pramod Sawant:...तर, राज्य सरकार घरोघरी आठ तास पाणीपुरवठा करू शकेल; CM सावंत यांची घोषणा

सरकारच्या तिजोरीत पाण्याच्या बिलातून मिळणारा महसूल 3% ने वाढला
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

पणजी: राज्यातील जनतेने सहकार्य केल्यास राज्य सरकार घरोघरी आठ तास पाणीपुरवठा करू शकेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सांगितले. आपण 24x7 पाणीपुरवठ्याबद्दल बोलत नसल्याचे स्पष्ट करून सावंत पुढे म्हणाले की, पाणी वाचवा मोफत पाणी योजनेअंतर्गत “55% घरांना मोफत पाणी मिळते”.

(Water bill revenue in the government coffers increased by 3%)

CM Pramod Sawant
Goa Petrol Price: गोव्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले? जाणून घ्या आजचे दर...

जल जीवन अभियानांतर्गत आयोजित सामुदायिक स्तरावरील प्रशिक्षणात सावंत बोलत होते. पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी, सरकार 16 रुपये खर्च करते, परंतु ते ग्राहकांना 3.5 रुपये दराने पुरवते, ते पुढे म्हणाले “राज्य सरकार जनतेला पाणी पुरवठा करण्यासाठी 13 रुपये खर्च करते.” सध्या, राज्याच्या मोफत पाणी वाचवा योजनेंतर्गत, 16,000 लिटरपर्यंतच्या पाण्याच्या वापरासाठी कुटुंबांकडून शुल्क आकारले जात नाही.

CM Pramod Sawant
Mopa Airport: काम अपूर्ण उद्धाटनाची घाई, मोपावरील उड्डाणसाठी करावी लागणार प्रतिक्षा

“मोफत पाणी देऊनही पाण्याच्या बिलातून मिळणारा महसूल 3% वाढला आहे,” असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले, ते म्हणाले, चार जणांच्या कुटुंबासाठी 16,000 लिटर पाणी पुरेसे आहे. राज्य सरकारला जनतेचे सहकार्य मिळाल्यास घरोघरी अधिक चांगले शुद्ध पाणी पुरवठा करता येईल, असे सांगून सावंत म्हणाले की, हर घर जल अंतर्गत पाणी देणारे गोवा हे पहिले राज्य आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com