Wall Collapses At Kundaim: पावसाचा रौद्रावतार! कुंडईमध्‍ये भिंत कोसळून ३ ठार

Ponda News: गंभीर कामगारांना इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले
Ponda News: गंभीर कामगारांना इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले
Kundaim Wall CollapseDainik Gomantak
Published on
Updated on

भर पावसात कुंडई औद्योगिक वसाहतीतील एका आस्थापनाची संरक्षक भिंत निवासी शेडवर कोसळून तीन कामगार ठार झाल्याची दुर्घटना आज (रविवारी) घडली. रविवार असल्याने हे कामगार शेडमध्येच विश्रांती घेत होते. मात्र, त्यांची ही विश्रांती कायमचीच विश्रांती ठरली. सकाळपासून कोसळत धुव्वाधार पावसामुळे ही संरक्षक भिंत कोसळली.

या दुर्घटनेत मुकेशकुमार सिंग (वय ३८ वर्षे) बिहार, त्रिनाथ नायक (वय ४७ वर्षे) ओरिसा आणि दिलीप यादव (वय ३७ वर्षे) बिहार हे तीन कामगार ठार झाले. चौथा कामगार जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात आले. कुंडई औद्योगिक वसाहतीमधील सदर्न इंजिनिअरिंग प्रोजेक्ट या आस्थापनाची ही भिंत असून तिन्ही मृत जयंती कन्स्ट्रक्शन या आस्थापनात कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होते. संरक्षक भिंतीला लागूनच ही पत्र्याची शेड उभारली होती. तेथे हे सर्व कामगार राहात होते.

दूर्घटना घडल्यानंतर लगेच अग्निशामक दलाला कळवल्यानंतर त्यांनी म्हार्दोळ पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली व माती आणि दगड काढण्याचे काम केले. त्यानंतर गंभीर जखमी कामगारांना फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. म्हार्दोळ पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवागारात ठेवण्यात आले आहेत. मयतांच्या कुटुंबियांना या दूर्घटनेची माहिती देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. म्हार्दोळ पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

अचानक मोठा आवाज झाला; चाैघेजण दरडीखाली चिरडले

अचानक मोठा आवाज करीत संरक्षक भिंत शेडवर कोसळल्यानंतर घटनास्थळी एकच हाहाकार उडाला. बाहेर धो धो कोसळणारा पाऊस आणि शेडवर दगड आणि मातीचा भराव, त्यामुळे शेड पूर्णत: दबली गेली. कोसळलेल्या मोठमोठ्या दगडांखाली चार कामगार दबले गेले. त्यातील तिघे दगावले, तर एक बचावला.

Ponda News: गंभीर कामगारांना इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले
Goa Rain: काणकोणात पावसामुळे महामार्गावर पाणी; प्रशासनाची धावपळ

सुटीदिवशी विश्रांती घेणाऱ्या कामगारांवर काळाचा घाला

जयंती कन्स्ट्रक्शन या आस्थापनात काम करणारे हे कामगार या शेडमध्ये राहात होते. बाहेर कोसळणारा धो धो पाऊस, त्यातच या संरक्षक भिंतीचा पाया खचला असावा, असा कयास व्यक्त केला जात आहे. भिंतीला लागून निवासी शेड कशी उभारली आणि धोकादायक स्थितीत कामगारांना कसे ठेवले जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Ponda News: गंभीर कामगारांना इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले
Accident In Kundaim: कुंडई येथे ट्रकचा अपघात! जखमींची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश

साठ वीज खांबांचे नुकसान

गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे राज्यातील सुमारे ६० वीज खांबांचे नुकसान झाले आहे. त्यातील काही खांब मोडले आहेत, तर काही कोसळले आहेत.

अधिकतर नुकसान सत्तरी, सांगे, उसगाव या भागात झाले आहे. काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला असून तो उद्यापर्यंत सुरळीत करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती मुख्य वीज अभियंते स्टीफन फर्नांडिस यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com